डेंग्यूचा फैलाव ही माध्यमांची किमया

By admin | Published: November 12, 2014 02:57 AM2014-11-12T02:57:26+5:302014-11-12T02:57:26+5:30

डेंग्यूच्या आजाराने मुंबईत थैमान घातले असताना ही प्रसिद्धिमाध्यमांनी हवा देऊन पसरवलेली साथ असून, डेंग्यू हा साधा आजार मीडियाने भयंकर करून ठेवला,

The spread of dengue is the medium of medium | डेंग्यूचा फैलाव ही माध्यमांची किमया

डेंग्यूचा फैलाव ही माध्यमांची किमया

Next
मुंबई महापौरांची मुक्ताफळे : नंतर केली सारवासारव
मुंबई : डेंग्यूच्या आजाराने मुंबईत थैमान घातले असताना ही प्रसिद्धिमाध्यमांनी हवा देऊन पसरवलेली साथ असून, डेंग्यू हा साधा आजार मीडियाने भयंकर करून ठेवला, अशी मुक्ताफळे महापौर स्नेहल आंबेकर यांनी आज राजावाडी रुग्णालयाच्या पाहणी दौ:यात उधळली़ मात्र याचे तीव्र पडसाद उमटताच मुंबईकरांची भीती कमी करण्यासाठी आपण असे विधान केल्याची सारवासारवही त्यांनी केली आह़े
मुंबईत डेंग्यूने आतार्पयत 12 रुग्णांचे बळी गेले आहेत. गेल्या दीड महिन्यात पालिकेच्या आकडेवारीनुसार 254 रुग्ण दाखल झाले आहेत़ मात्र हा आजार वाढण्याचे खापर यापूर्वी पालिकेने मुंबईकरांवर फोडले आह़े घरामध्ये साठलेल्या पाण्यातच डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने घरमालकांना अटक करण्याचा फतवाही प्रशासनाने काढला होता़
यावर टीका होताच पालिकेने 
घूमजाव करीत नागरिकांवर खटला भरण्याची कारवाईच सुरू असल्याचे स्पष्ट केल़े मात्र हा वाद मिटतो ना मिटतो तोच महापौरांच्या धक्कादायक विधानाने पुन्हा एकदा पालिकेवर टीकेची झोड उठली आह़े (प्रतिनिधी)
 
सारवासारव
या विधानाचे तीव्र पडसाद उमटताच महापौरांनी संध्याकाळी घूमजाव करीत आपल्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता, असा बचाव केला आह़े राजावाडी रुग्णालयाच्या पाहणी दौ:यात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमधील भीती कमी करण्यासाठी आपण असे म्हटल्याचे आंबेकर यांनी सांगितले.
 
वादग्रस्त महापौर
पहिल्यांदाच नगरसेवकपदी निवडून आलेल्या स्नेहल आंबेकर यांना महापौरपदाची लॉटरीही लागली़ मात्र त्यांची महापौरपदाच्या कारकिर्दीची सुरुवातच वादग्रस्त ठरली़ महापौरांच्या गाडीवर लालदिवा हवाच असा हट्ट त्यांनी धरला होता़ त्यानंतर दीपावलीनिमित्त महापौर निवासस्थानी संगीताच्या कार्यक्रमात नृत्य करून त्यांनी सर्वानाच अवाक् केले होत़े
 
मुंबईकरांचे प्रतिनिधित्व करणा:या शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या आंबेकर यांनी असे विधान करणो योग्य नाही़ भाजपाबरोबर बिघडलेले सूर आणि डेंग्यूचा आजार नियंत्रणात आणण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी शिवसेनेत असा गोंधळ उडू लागला आह़े 
- देवेंद्र आंबेरकर, 
विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका
 
आतार्पयत 12 रुग्णांनी जीव गमावल्यानंतर हा आजार गंभीर नाही, म्हणणो चुकीचे ठरेल़ महापौरांना याचे महत्त्व कळायला हवे होत़े
- संदीप देशपांडे, 
मनसेचे महापालिकेतील गटनेते
 
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील रुग्ण 
आजारऑक्टोबरनोव्हेंबर (1 ते 10)
ताप132142528
मलेरिया1004181
लेप्टो110
डेंग्यू21341

 

Web Title: The spread of dengue is the medium of medium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.