योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा
By admin | Published: April 29, 2015 01:53 AM2015-04-29T01:53:16+5:302015-04-29T01:53:16+5:30
मुंबई विद्यापीठामार्फत गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत महाविद्यालये उदासीन आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत महाविद्यालये उदासीन आहेत. विद्यापीठाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी महाविद्यालयांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून माहितीपुस्तिका आणि संकेतस्थळावरून योजनांची माहिती द्यावी, अशा सूचना विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण केंद्राकडून महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
गोरगरीब, आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत बुक बँक ही योजना राबविण्यात येते. एसी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा दरवर्षी सुमारे ३५ हजार विद्यार्थी लाभ घेत असतात. विद्यापीठामार्फत ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येते.
परंतु महाविद्यालयांमार्फत या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोचविल्या जात नाहीत. तसेच विद्यार्थीही याबाबत जागरूक नसल्याने या योजना गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत, याची दखल घेत विद्यार्थी कल्याण केंद्रातील अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच
पार पडली. त्यामध्ये हा हा
निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात
आले. (प्रतिनिधी)
च्केंद्राने परिपत्रक काढून महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या योजनांची माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या योजनांची माहिती महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोचविल्यास गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, असे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण केंद्राचे संचालक डॉ. मृदुल निळे यांनी सांगितले.
च्गोरगरीब, आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत विविध योजना राबविण्यात
येतात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वद्यापीठामार्फत बुक बँक ही योजना राबविण्यात येते. मात्र फारच कमी विद्यार्थी त्याचा लाभ घेतात.
च्विद्यार्थी कल्याण केंद्रातील अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्यात महाविद्यालयांनी माहिती पुस्तिका आणि संकेतस्थळावरुन विद्यापीठाच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याबाबत निर्णय झाला. त्यानुसार सर्व महाविद्यालयांना आदेश देण्यात आले आहेत.