स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा प्रसार महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:05 AM2021-07-08T04:05:50+5:302021-07-08T04:05:50+5:30

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रप्रेम आणि त्यांची देशभक्ती याबरोबरच आजच्या काळाला अनुसरून असलेल्या त्यांच्या विज्ञानवादी विचारांचा प्रचार व ...

The spread of Swatantryaveer Savarkar's scientific ideas is important | स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा प्रसार महत्त्वाचा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा प्रसार महत्त्वाचा

Next

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रप्रेम आणि त्यांची देशभक्ती याबरोबरच आजच्या काळाला अनुसरून असलेल्या त्यांच्या विज्ञानवादी विचारांचा प्रचार व प्रसार होणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अनुवादक डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी मांडले. व्यास क्रिएशन्सने प्रकाशित केलेल्या सावरकर परिवार विशेषांकाच्या गडकरी रंगायतन येथे अलीकडेच पार पडलेल्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे विचार व्यक्त केले.

विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्त्रिया; तसेच सक्षमपणे घर सांभाळणारी स्त्री यांचे महत्त्व अधोरेखित करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घराण्यातील स्त्री-रत्नांचा त्यांनी यावेळी गौरव केला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता राजे, लेखिका व निवेदिका साधना जोशी, लेखक अनंत शंकर ओगले, राज्ञी महिला मंचच्या व्यवस्थापिका नेहा पेडणेकर, अभिजात नाट्यसंस्थेचे रंगकर्मी आकाश भडसावळे यावेळी उपस्थित होते. सावरकर साहित्य शृंखला उपक्रमाचा प्रातिनिधिक शुभारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी ‘होय, मी सावरकर बोलतोय’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

Web Title: The spread of Swatantryaveer Savarkar's scientific ideas is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.