बोरिवलीत रंगणार वसंत व्याख्यानमाला
By मनोहर कुंभेजकर | Published: May 16, 2024 05:22 PM2024-05-16T17:22:49+5:302024-05-16T17:23:23+5:30
प्रख्यात साहित्यिक विजय मडव यांना यंदाचा शारदा पुरस्कार देण्यात येणार असून जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते दिलीप चव्हाण आणि वसंत सावंत यांना देण्यात येणार आहे.
मुंबई - ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित विजय वैद्य हे गेल्या ४१ वर्षांपासून मुंबई उपनगरातील रसिक श्रोत्यांना अविरत बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून देतात. यंदाच्या ४२ व्या वर्षीच्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेत सालाबादप्रमाणे देण्यात येणारे शारदा पुरस्कार आणि जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार यांच्या नावांची घोषणा केली असून या वर्षापासून प्रेरणा पुरस्कारही देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
प्रख्यात साहित्यिक विजय मडव यांना यंदाचा शारदा पुरस्कार देण्यात येणार असून जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते दिलीप चव्हाण आणि वसंत सावंत यांना देण्यात येणार आहे. यंदाचा पहिला वहिला प्रेरणा पुरस्कार विजय घरटकर यांना देण्यात येणार आहे.
वायंगणकर साई स्पोर्ट्स च्या मल्लखांबपटू कुमारी हर्षिता राकेश वायंगणकर हिने राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ स्पर्धेत अभिमानास्पद यश संपादन केले असून या तिच्या यशाबद्दल तिलाही सन्मानित करण्यात येणार आहे.
रविवार, दि,२६ मे २०२४ रोजी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक विजय वैद्य आणि प्रा. नयना रेगे यांनी दिली.