Corona Vaccine: सेंट जाॅर्ज रुग्णालयात आता रशियन स्पुटनिक व्ही लसीची मानवी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:00 AM2021-02-08T05:00:43+5:302021-02-08T05:01:08+5:30

Corona Vaccine: नोव्हेंबर महिन्यांत सेंट जाॅर्ज रुग्णालय या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी सहभागी झाले. त्या वेळी १८ स्वयसेंवकांनी नोंदणी करून सहभाग घेतला, त्यापैकी सहा डॉक्टर्स होते.

Sputnik vaccine Phase III trial: St Georges hospital recruits 144 participants | Corona Vaccine: सेंट जाॅर्ज रुग्णालयात आता रशियन स्पुटनिक व्ही लसीची मानवी चाचणी

Corona Vaccine: सेंट जाॅर्ज रुग्णालयात आता रशियन स्पुटनिक व्ही लसीची मानवी चाचणी

Next

मुंबई : कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीनंतर आता शहर उपनगरात तिसऱ्या टप्प्यातील रशियन स्पुटनिक व्ही लसीची मानवी चाचणी सुरू आहे. सेंट जाॅर्ज रुग्णालयात सुरू असलेल्या या मानवी लस चाचणीत आतापर्यंत १४४ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे, जानेवारीत या स्वयंसेवकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

नोव्हेंबर महिन्यांत सेंट जाॅर्ज रुग्णालय या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी सहभागी झाले. त्या वेळी १८ स्वयसेंवकांनी नोंदणी करून सहभाग घेतला, त्यापैकी सहा डॉक्टर्स होते. त्यानंतर नुकताच या रुग्णालयाने लसीचा तिसरा टप्पा पूर्ण केला आहे. याविषयी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील चाचणी २० ते ३० जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्यात आली. मात्र प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार, या लसीच्या चाचणीविषयी गोपनीयता पाळण्यात आली. या लसीच्या मानवी चाचणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सहभाग घेतला. सुरुवातीस १०० जणांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली, त्यानंतर अनेक जण लस घेण्याविषयी सकारात्म असल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढली. एकूण १४४ लाभार्थ्यांपैकी ४४ लाभार्थी हे खासगी रुग्णालयातील डॉक्टर आहेत. 

लाभार्थींच्या प्रकृतीवर ठेवणार लक्ष 
स्पुटनिक व्ही या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांविषयी वैद्यकीय जर्नल ‘द लॅन्सट’मध्ये अभ्यास अहवाल मांडण्यात आला आहे, या अहवालानुसार कोविडविरोधात ही लस ९० टक्के सुरक्षित व उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, लस घेतलेल्या लाभार्थ्यांना कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनप्रमाणे या लसीचाही दुसरा डोस आवश्यक असून २८ दिवसांनंतर तो घेणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे दुसऱ्या डोसकरिता पुढील आठवड्यात सुरुवात होईल. त्यानंतर पुढील सात महिन्यांच्या कालावधीसाठी लाभार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येईल. 

Web Title: Sputnik vaccine Phase III trial: St Georges hospital recruits 144 participants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.