चड्डी-बनियान टोळीतील फरार आरोपींना शोधण्यासाठी पथके

By Admin | Published: February 12, 2016 03:22 AM2016-02-12T03:22:47+5:302016-02-12T03:22:47+5:30

बोरीवली येथे कुख्यात चड्डी-बनियान टोळीच्या चार लुटारूंना पोलिसांनी अटक केली आहे. तरी टोळीतील फरार असलेल्या आठ ते नऊ साथीदारांना शोधण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात

Squads to find absconding gangs | चड्डी-बनियान टोळीतील फरार आरोपींना शोधण्यासाठी पथके

चड्डी-बनियान टोळीतील फरार आरोपींना शोधण्यासाठी पथके

googlenewsNext

मुंबई : बोरीवली येथे कुख्यात चड्डी-बनियान टोळीच्या चार लुटारूंना पोलिसांनी अटक केली आहे. तरी टोळीतील फरार असलेल्या आठ ते नऊ साथीदारांना शोधण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय या टोळीने पूर्वी ज्या लोकांची घरे लुबाडली आहेत, त्या लोकांनीही पोलिसांना संपर्क करण्यास सुरुवात केली आहे.
थरारक मोहिमेंतर्गत पोलिसांनी या टोळीच्या रमेश काळे (३०), संजय काळे (२५), अशोक शिंदे (३५ ) आणि संतोष चव्हाण (३५) या चौघांना अटक केली. सध्या चौघांचीही कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे फरार साथीदार ज्या ज्या ठिकाणी लपण्याची शक्यता आहे, त्या त्या ठिकाणची माहिती पोलीस चौघांकडून घेत आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांचाही लेखाजोखा तपासण्याचे काम सुरू आहे.
टोळीतील फरार आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर पुजारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पुजारी म्हणाले की, विशेष पथके फरार आरोपींच्या मागावर आहेत. शिवाय टोळीने ज्या ठिकाणी दरोडे टाकले होते, त्यातील पीडितांनाही पोलीस संपर्क साधत आहेत. मात्र याबाबत अधिक माहिती तूर्तास तरी देता येणार नाही. मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरात या टोळीच्या लुटारूंचा वावर असून सध्या बोरीवली पोलीस त्यांचा माग घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Squads to find absconding gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.