एसआरए इमारतींचे तीन-तेरा; आपत्कालीन दुर्घटनांची होत आहे पुनरावृत्ती, याला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 01:41 PM2023-10-08T13:41:59+5:302023-10-08T13:43:25+5:30

एसआरए इमारतींचीही पडझड होत असून, दुरुस्तीसाठी प्राधिकरणाकडून वेगवान कारवाई केली जात नाही.

SRA building issue; Recurrence of emergency accident, who is responsible for this? | एसआरए इमारतींचे तीन-तेरा; आपत्कालीन दुर्घटनांची होत आहे पुनरावृत्ती, याला जबाबदार कोण?

एसआरए इमारतींचे तीन-तेरा; आपत्कालीन दुर्घटनांची होत आहे पुनरावृत्ती, याला जबाबदार कोण?

googlenewsNext

मुंबइ : एसआरएच्या इमारती बांधून देणारा बिल्डर, इमारतीमध्ये कार्यरत असणारी सोसायटी आणि सहकार विभाग यांचा समन्वय नसल्याने एसआरए इमारतीचे तीन-तेरा वाजले आहेत. परिणामी गोरेगाव येथील जय भवानीसारख्या एसआरएच्या इमारतींमध्ये आपत्कालीन दुर्घटनांची पुनरावृत्ती होत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), सहकार विभाग आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी एकत्र येत उपाययोजना करण्यात याव्यात; यावर झोपडपट्टी प्रश्नांवर काम करणाऱ्या अभ्यासकांनी प्रकाश टाकला आहे.

-  एसआरए इमारतींचीही पडझड होत असून, दुरुस्तीसाठी प्राधिकरणाकडून वेगवान कारवाई केली जात नाही.
-  धारावी, बीकेसीमधील भारत नगर आणि गोवंडी, मानखुर्दमधील इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी असून, घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी कारवाई होत नाही. याचा त्रास मूळ रहिवाशांना होतो.
-  एसआरए इमारतीला प्राधिकरणाकडून ओसी दिली जात नाही. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा करत नाही. परिणामी, रहिवाशांना पाण्यासाठी लगतच्या वस्तीवर अवलंबून राहावे लागते. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
-  एसआरए इमारत जीर्ण झाल्यावर प्राधिकरणासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानग्या लवकर मिळणे अपेक्षित असते. मात्र, परवानग्यांसाठी ताटकळत राहावे लागते.
-  घरांची बेकायदेशीर खरेदी- विक्री केली जाते. याचा एसआरए प्राधिकरणाला थांगपत्ता नसतो. मानखुर्द, मालवणी आणि कुर्ला येथे हे प्रकार खुलेआमपणे होतात.
-  खरेदी-विक्रीमध्ये पात्र- अपात्र प्रक्रियेला वेळ लागतो. त्यामुळे हजारो घरमालकांचे प्रस्ताव रखडल्याचे चित्र आहे.
-  एसआरएकडून वारसा पत्र मिळत नाही. त्यामुळे कुटुंबांमध्ये वाद निर्माण होतात. 
-  एसआरएमधील सोसायटींमध्ये सदस्यपद नसल्याने खरेदी- विक्रीच्या प्रक्रियेत रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

दुर्घटनांना निमंत्रण
- इमारत बांधकामासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट असते.
-  इमारती बाहेर मोकळा स्पेस सोडला जात नाही. यामुळे येथे आग लागल्यास तेथे अग्निशमन दलाची गाडी फिरू शकत नाही.
-  फायर फायटिंग सीस्टिंम लावले जात नाही. एखाद्या इमारतीमध्ये ही सीस्टिंम असल्यास ती कुचकामी असते.
-  इमारतीमधील लिफ्ट कुचकामी असते.
-  रिफ्युजी स्पेस सोडला जात नाही. तर तेथे बांधकाम करतात. 
-  इमारतीखाली पार्किंग स्पेस दिला जात नाही.
 

Web Title: SRA building issue; Recurrence of emergency accident, who is responsible for this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई