SRA: एकमेका साह्य करू... असे आहे २ लाख झोपड्यांचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:52 AM2024-10-15T10:52:35+5:302024-10-15T10:53:14+5:30

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना अन्य महामंडळे प्राधिकरणे यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वांवर राबविणेकरिता दि. २१/०९/२०२३ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

SRA: different government bodies come together to plan and build 2 lakh houses | SRA: एकमेका साह्य करू... असे आहे २ लाख झोपड्यांचे नियोजन

SRA: एकमेका साह्य करू... असे आहे २ लाख झोपड्यांचे नियोजन

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे झोपड्यांच्या पुनर्वनसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसनाला गती येण्यासाठी शासनाने मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महापे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याद्वारे सुमारे दोन लाख झोपड्यांचे पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने या महामंडळांनी संयुक्त उपक्रम करण्याचे योजले आहे. 

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना अन्य महामंडळे प्राधिकरणे यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वांवर राबविणेकरिता दि. २१/०९/२०२३ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका, MMRDA, MSRDC, MHADA, CIDCO, MIDC इत्यादी शासकीय यंत्रणांसोबत संयुक्ती भागीदारी तत्वावर राबविण्याचे निश्चित केले असून २ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 


या योजना बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या असल्याने आता संयुक्त भागीदारी तत्वावर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुढील कालावधीत रखडलेल्या योजनांना गती शक्य होणार आहे. 

तसेच MMRDA व SRA यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर (JV) रमाबाई कॉलनी घाटकोपर ही झोपु योजा विकसित करण्याचे निश्चित झाले असून सदर प्रकल्पासंदर्भात पात्रता निश्चितीकरण, भूमी अधिग्रहण करण्याबाबत कार्यवाही चालू आहे. याद्वारे अंदाजे १६००० झोपडीधारक कुटुंबांचे पुनर्वसन होणार आहे. 

योजना राबविणारे संबंधित प्राधिकरण स्वतः झोपडीधारकांचे भाडे भरण्याची तरतूद केली असून चांगल्या प्रतीची दर्जेदार घरे बांधण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील काही कालावधीत अंदाजे २ लक्ष झोपडीधारकांना घरे मिळणार आहेत. त्यासाठी आमचा विभाग कसून प्रयत्न करत आहे, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.  

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईच्या वेबसाईटला भेट द्याः http://sra.gov.in/

Web Title: SRA: different government bodies come together to plan and build 2 lakh houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.