अंधेरीत एसआरए घोटाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:00 AM2018-05-23T02:00:27+5:302018-05-23T02:00:27+5:30

संबंधित प्रकल्पात केवळ २१ रहिवासी पात्र होते. मात्र, तरीही विकासकाने १०७ रहिवासी पात्र असल्याचे दाखवत प्रकल्प मंजूर करून घेतला.

SRA scam in the dark! | अंधेरीत एसआरए घोटाळा!

अंधेरीत एसआरए घोटाळा!

Next

मुंबई : अंधेरीतील एस.व्ही. रोडवर असलेल्या तलाव मार्केट टॉवर या एसआरए प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एका स्थानिक रहिवाशाने केला आहे. उपजिल्हाधिकारी कार्यालयानेही या प्रकरणी खेरवाडी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन एक वर्ष उलटले आहे. मात्र, कार्यवाहीस टाळाटाळ होत असल्याचे स्थानिकाने सोमवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
स्थानिकाने केलेल्या आरोपानुसार, संबंधित प्रकल्पात केवळ २१ रहिवासी पात्र होते. मात्र, तरीही विकासकाने १०७ रहिवासी पात्र असल्याचे दाखवत प्रकल्प मंजूर करून घेतला. त्यातील १०२ सदस्यांना मंजुरी देत प्रकल्प उभारणीही झाली. मात्र, उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर यासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उपजिल्हाधिकाºयांनी या प्रकल्पातील सदस्यांच्या कागदपत्रांची फेरतपासणी केली. त्यात फक्त २१ रहिवासी पात्र आढळले असून उरलेले सर्व रहिवासी अपात्र ठरवण्यात आले. याशिवाय पोलिसांना या प्रकरणी गुन्हा नोंदवत चौकशीचे आदेशही उपजिल्हाधिकाºयांनी दिले.
यासंदर्भात विकासकाशी संपर्क केला असता, या प्रकरणी एसआरएच्या उच्चाधिकार समितीसमोर सुनावणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. मुळात हा मुद्दा उपजिल्हाधिकारी व रहिवाशांमुळे सुरू आहे. त्यासाठी सर्व अपात्र ठरवलेल्या रहिवाशांकडून कागदपत्रांचे सादरीकरण सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पात सर्व बांधकाम हे नियमानुसार केल्याचा दावा करत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचे विकासकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.

सुट्टीच्या दिवशी काढले रेशन कार्ड!
अपात्र ठरवण्यात आलेल्या रहिवाशांमध्ये काही रहिवाशांनी १५ आॅगस्ट १९९२ रोजी रेशन कार्ड काढल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय काही रहिवाशांनी सादर केलेले गुमास्ता परवानेही खोटे असल्याचे उपजिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आल्याचा आरोप स्थानिक रहिवाशाने केला आहे. म्हणूनच या प्रकरणाची राज्य सरकारने स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: SRA scam in the dark!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर