एसआरए घोटाळा - काँग्रेसच्या माजी आमदाराचे 33 फ्लॅट्स जप्त, 462 कोटींच्या संपत्तीवर टाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 08:51 AM2018-04-07T08:51:23+5:302018-04-07T09:05:03+5:30

33 फ्लॅट्स जप्त करण्यात आले आहेत.  त्याचे मुल्य तब्बल 462 कोटी रुपये आहे.

SRA scam involving Baba Siddique: ED attaches 33 flats of Pyramid Developers | एसआरए घोटाळा - काँग्रेसच्या माजी आमदाराचे 33 फ्लॅट्स जप्त, 462 कोटींच्या संपत्तीवर टाच

एसआरए घोटाळा - काँग्रेसच्या माजी आमदाराचे 33 फ्लॅट्स जप्त, 462 कोटींच्या संपत्तीवर टाच

googlenewsNext

मुंबई - एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन योजना) घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकींवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. काल शुक्रवारी वांद्रे येथील सिद्दीकींच्या कंपनीचे 33 फ्लॅट्स जप्त करण्यात आले आहेत.  त्याचे मुल्य तब्बल 462 कोटी रुपये आहे.  ही सर्व मालमत्ता मे. पिरॅमिड डेव्हलपरची असून, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा कंपनीवर आरोप आहे. याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. या घोटाळ्यात काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचाही संबंध समोर आल्याचे समजते.  

'ईडी'ने गेल्यावर्षी मार्चमध्ये या कंपनीच्या विविध मालमत्तांचा तपास केला होता. या मालमत्तांचा संबंध बाबा सिद्दिकी यांच्याशी आढळून आला आहे. मुंबई पोलिसांकडून नोंदवल्या गेलेल्या 'एफआयआर'ची दखल घेत 'ईडी'ने तपास सुरू केला.  मुंबई पोलिसांनी सन २०१४मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. प्रकल्पपूर्तीच्या काळात म्हणजे सन २००० ते २०००४पर्यंत सिद्दिकी म्हाडाचे अध्यक्ष होते.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत एखाद्या भूखंडाचा विकास करायचा असेल, तर त्या भूखंडाचा काही भाग झोपडपट्टीधारकांसाठी सोडून द्यावा लागतो. मात्र, हे करताना सिद्दिकी आणि मकबूल कुरेशी यानं संगनमतानं बनावट कागदपत्रे बनविल्याचा आणि  त्या माध्यमातून सुमारे १०० ते ४०० कोटींचा घोटाळा केला असा आरोप करण्यात आलाय. या प्रकल्पांमध्ये बोगस लाभधारक असल्याचा आरोप सिद्दीकींवर होतोय. मकबूल यांच्याकडून बाबा सिद्दिकी यांच्या कंपनीला पैसे गेल्याची कागदपत्रे ईडीला मिळालीयेत अशी माहिती मिळतेय. या या सगळ्या प्रकरणामुळे बाबा चांगलेच अडचणीत आलेत.

काय बाबा सिद्दीकीवर करण्यात आलेले आरोप
- शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणे
- बनावट दस्तावेज तयार करणे
- खोटी माहिती सादर करणे
- बोगस कंपण्या स्थापन करणे
- बनावट बिलं बनवणे
- अधिकाराचा गैरवापर करणे
- काळा पैसा परदेशात पाठवणे  

Web Title: SRA scam involving Baba Siddique: ED attaches 33 flats of Pyramid Developers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.