झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीधारकांना केवळ पक्के घर दिले नाही तर त्यांना एक विश्वासही दिला. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. पुनर्वसनाच्या आधी ज्या जागेवर झोपड्या होत्या ती स्थिती कशी होती आणि त्या ठिकाणी चांगले टॉवर उभे केल्यानंतर नेमके काय झाले ते या छायाचित्रांमधून लक्षात येईल. झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरए ने वेगाने पावले उचलली. मुंबईतील विविध भागांत आधी काय स्थिती होती आणि पुनर्विकासानंतर किती सुंदर इमारती उभा राहिल्या.
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घाटकोपर पश्चिमेकडील चिरागनगर येथे साहित्यरन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधण्यासाठी २०१६ साली समिती स्थापन केली होती. यामध्ये उपनगरचे जिल्हाधिकारी, एसआरएचे सदस्य आणि महापालिकेच्या उपायुक्तांचा सदस्य आणि इतर दोन सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. २०१७ साली ही समिती विकासक निश्चित करेल, असा निर्णय घेण्यात आला. २०१७ साली यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. शिवाय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची नेमणूक करण्यात आली. २०१७ साली वास्तुविशारद म्हणून योगेश धायगुडे यांनी नियुक्ती केली. त्यानंतर झालेल्या बैठका आणि कामाने गती पकडली आणि २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, चिरागनगर, घाटकोपर येथे बांधण्याबाबत परवानगी व हा प्रकल्प सार्वजनिक निवडीचा प्रकल्प घोषित करण्यात आला.
२०१९ साली मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत स्मारकाचे काम एसआरए व म्हाडा किंवा शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधण्यात यावे. यामुळे पुनर्वसित होणाऱ्या झोपडीधारकांना संक्रमण शिबिरासाठी जागा म्हाडाने द्यावी. विकास आराखड्यातील रोडचे आरक्षण बदलून द्यावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. स्मारकासाठी व झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी तीन भित्र भूखंड मिळून २३८८२ चौमी जागा प्रस्तावित करण्यात आली. २०२० साली झालेल्या बैठकीत स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यानच्या काळात एसआरएने वास्तुविशारद आणि अधिकान्यांच्या बैठका घेत सुविधा नियोजित केल्या, ज्यामध्ये प्रवेशिका, माहिती कक्ष, प्रदर्शन कक्ष, संग्रहालय क्षेत्र, अण्णाभाऊ साठे कक्ष, शाहीर अमर शेख कक्ष, शोषित लढ्याचा कक्ष, साहित्य कक्ष, ए.वही. गॅलरी, परिषद कक्ष, कला व साहित्य कक्ष, वाचनालय, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका, सभागृह, तामील रुम, रेकॉर्डिंग कक्ष, सभागृह लॉब, प्रशासक कार्यालय, कैफे, पुस्तक व भेट वस्तूचे दुकान, शौचालय, लॉबी, वाहनतळ, एमईपी, खुले मध्यवर्ती व्यासपीठ, बगिया क्षेत्र असे ५ हजार ५०० चौमीवर प्रस्तावित करण्यात आले. दरम्यान हा प्रकल्प शासनाचा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला.
२०२२ पर्यंत यासंदर्भातील बैठका होत असतानाच वेगाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. २०२२ साली झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्यांच्या ठिकाणी त्यांचे त्यावेळचे घर आहे तसे ठेवून आजूबाजूचा परिसर विकसित करण्याचे ठरले. त्यानुसार, २०२३ साली प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्यांचे त्यावेळचे घर आहे तसे ठेवून आजूबाजूचा परिसर विकसित करण्याचे ठरले. त्याठिकाणी पाण्याचे कांरजे, सेल्फी पॉइंट, समग्र क्रीडा संकुल, कला दालने, पोहण्याचा तलाय, मैदानी खेळ, नाट्धसंकुल, कला दालने, सांस्कृतिक दालने या सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या, अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व त्यांच्या राहत्या घराचे जतन करून आजूबाजूचा परिसरत सुशोभित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. याचा खर्च ३०५ कोटी ६२ लाख २९ हजार १७३ एवढा आहे. त्यानंतर ११ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, चिरागनगर, घाटकोपर येथे बांधण्याबाबत परवानगी व हा प्रकल्प सार्वजनिक निवडीचा प्रकल्प घोषित करण्यात आला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधान मंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देशातील बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा देण्याचा संकल्प सिद्धीस नेत आहेत. याच उद्दिष्टांवर शासन कार्यरत असून राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण सक्षम अधिकारी वल्सा नायर-सिंह यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आकार घेत आहे. या गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांच्या उभारणीवर भर दिला जाणार आहे. राज्यातील प्रत्येक बेधर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयनशील आहे. मुंबईकरांचे स्वतःचे घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत आहे. - अतुल सावे, गृहनिर्माणमंत्री.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईच्या वेबसाईटला भेट द्या