एसआरएला पर्याय उभारणार! - संदीप येवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 08:10 PM2017-07-18T20:10:10+5:302017-07-18T20:10:10+5:30

एसआरएला पर्याय उभारत बिल्डरांना मुंबईतून हद्दपार करण्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी व्यक्त केले आहे.

SRA will set up options! Sandeep came | एसआरएला पर्याय उभारणार! - संदीप येवले

एसआरएला पर्याय उभारणार! - संदीप येवले

Next

ऑनालइन लोकमत

मुंबई, दि. 18 : एसआरएला पर्याय उभारत बिल्डरांना मुंबईतून हद्दपार करण्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी व्यक्त केले आहे. विक्रोळी पार्क साईटमधील हनुमान नगर एसआरए प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप करत येवले यांनी पत्रकार परिषदेत १ कोटी रुपयांची लाच उघडकीस आणली होती. त्यानंतर त्यांच्या समर्थनात विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे प्रतिनिधींनी मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली. यावेळी येवले म्हणाले की, एसआरए हे बिल्डरांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. त्यामुळेच मुंबईतील एसआरए प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन सभा घेत लोकांना संघटीत करून संघर्ष करणार आहे. एसआरएला कोणता पर्याय उभा करता येईल?, याबाबत आदर्श मॉडेल तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या मॉडेलच्या मदतीने मुंबईतून बिल्डरांची हकालपट्टी केली जाईल. प्रकल्पांना लागणारा वित्तपुरवठा कशाप्रकारे उभा करता येईल? याचाही अभ्यास सुरू आहे. कारण मुंबईत १४ लाख घरांची आवश्यकता असून त्यासाठी लाखो टन स्टील आणि सिमेंट लागणार आहे. याशिवाय येथील भौगौलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच पुढील पावले उचलली जातील.
यावेळी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या की, एमएमआरडीए, महापालिका, एसआरए आणि म्हाडा अधिकाऱ्यांनी पुनर्विकास प्रकल्प ्म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली मोकळ््या आणि मोक्याच्या जमिनी बिल्डरांच्या घश्यात घातल्या जात आहेत. ३३/७ प्रकल्पात पुनर्वसनाच्या घरांसाठी १५ टक्के घरे देण्याची तरतूद असतानाही महापालिका या नियमाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. तरी येवले यांना पोलीस संरक्षण देऊन सरकारने याप्रकरणासाठी चौकशी आयोग नेमण्याची मागणीही चव्हाण यांच्यासह उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी
केली आहे.

दोन दिवसांत तक्रार दाखल करणार!
हनुमान नगर एसआरए प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यांनी यासंदर्भात लक्ष असल्याचे सांगत लवकरच सविस्तर चर्चेसाठी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासह अंमलबजावणी संचलनालय (ईडी), पोलीस आयुक्त आणि आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) यांकडेही येत्या दोन दिवसांत तक्रार दाखल करणार असल्याचे येवले यांनी सांगितले.

ते पैसे एसीबीकडे देणार!
स्टींग आॅपरेशमध्ये लाच म्हणून मिळालेले पैसे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री निधीमध्ये घेण्यास नकार दिल्याची माहिती येवले यांनी ह्यलोकमतह्णला दिली. ते म्हणाले की, सर्व पैसे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जमा करणार आहे. या पैशांमध्ये ५०० रुपये किंमतीच्या १०० नोटांचे ६० गठ्ठे आणि दोन हजार रुपयांच्या १०० नोटांचे ५ गठ्ठे आहेत. या सर्व नोटांचे क्रमांक लिहून ते तक्रारीसह एसीबीकडे दिले जातील. शिवाय इतके पैसे कुठूनआणि कोणत्या मार्गाने आले, याचाही तपासण करण्याची मागणी केली जाईल

Web Title: SRA will set up options! Sandeep came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.