श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी भाविकाकडून तब्बल 35 किलो सोने अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:02 AM2020-01-21T10:02:24+5:302020-01-21T10:02:41+5:30

प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी एका भक्ताने तब्बल ३५ किलो सोने अर्पण केले आहे.

Sree Siddhivinayaka's Donation offered 35 kg of gold | श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी भाविकाकडून तब्बल 35 किलो सोने अर्पण

श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी भाविकाकडून तब्बल 35 किलो सोने अर्पण

Next

मुंबईः प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी एका भाविकानं तब्बल ३५ किलो सोने अर्पण केले आहे. या सोन्याचा वापर सिद्धिविनायक मंदिराला सुवर्ण झळाळी देण्यासाठी करण्यात आला आहे. त्यानुसार मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमट आदी ठिकाणी सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.सिद्धिविनायक मंदिराला एका भाविकानं दान केलेल्या 35 किलो सोन्याची किंमत अंदाजे 14 कोटी रुपयांच्या घरात आहे. मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर हे श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दान मागच्या आठवड्यात करण्यात आलं होतं. सिद्धिविनायक मंदिराला अनेक भाविक कोट्यवधी रुपये दान स्वरूपात देतात. तसेच काही जण सोने, चांदी यांसारखी रत्नं सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करतात. सिद्धिविनायकाला हे 35 किलो सोनं दिल्लीतल्या एका भाविकानं दान केलं आहे.



सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी 35 किलो सोनं दान स्वरूपात मिळाल्याची माहिती दिली आहे. दान स्वरूपात मिळालेल्या सोन्याचा वापर मंदिराचा दरवाजा आणि छत तयार करण्यासाठी केला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Web Title: Sree Siddhivinayaka's Donation offered 35 kg of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.