मुंबईः प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी एका भाविकानं तब्बल ३५ किलो सोने अर्पण केले आहे. या सोन्याचा वापर सिद्धिविनायक मंदिराला सुवर्ण झळाळी देण्यासाठी करण्यात आला आहे. त्यानुसार मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमट आदी ठिकाणी सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.सिद्धिविनायक मंदिराला एका भाविकानं दान केलेल्या 35 किलो सोन्याची किंमत अंदाजे 14 कोटी रुपयांच्या घरात आहे. मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर हे श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे दान मागच्या आठवड्यात करण्यात आलं होतं. सिद्धिविनायक मंदिराला अनेक भाविक कोट्यवधी रुपये दान स्वरूपात देतात. तसेच काही जण सोने, चांदी यांसारखी रत्नं सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करतात. सिद्धिविनायकाला हे 35 किलो सोनं दिल्लीतल्या एका भाविकानं दान केलं आहे.
श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी भाविकाकडून तब्बल 35 किलो सोने अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:02 AM