मुंबई - बॉलिवूडची 'चांदनी', 'हवाहवाई' श्रीदेवी यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला आहे. श्रीदेवी यांच्यावर विलेपार्लेतल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले असून, त्या अनंतात विलीन झाल्या आहेत. बॉलिवूडच्या चांदनीला अखेरचा निरोप देण्यात आला आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव मंगळवारी (27 फेब्रुवारी) रात्री उशीरा दुबईहून मुंबईमध्ये आणण्यात आले. यानंतर आज सकाळी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील सेलिब्रेशन क्लब येथे ठेवण्यात आले होते. श्रीदेवी यांचे अखेरचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची गर्दी केली होती. अखेर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. LIVE UPDATES :श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी उसळला जनसागर
श्रीदेवी यांना पाहण्यासाठी विलेपार्ले पश्चिमेकडे रस्त्याच्या कडेला चाहत्यांची गर्दी, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे.
मुंबई पोलिसांकडून श्रीदेवी यांना मानवंदना
श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
पांढऱ्या शुभ्र फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा
जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज
श्रीदेवी यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर
श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय-बच्चन सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब येथे दाखल
हेमा मालिनी व इशा देओल
संजय कपूर, हर्षवर्धन कपूर सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल
श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो चाहते सेलिब्रेशन क्लब येथे दाखल
फराह खान, सोनम कपूर सेलिब्रेशन क्लबमध्ये पोहोचले
अभिनेता अरबाज खान सेलिब्रेशन क्लबमध्ये दाखल
श्रीदेवी यांचे पार्थिव सेलिब्रेशन क्लबमध्ये आणण्यात आले
सेलिब्रेशन क्लब बाहेर चाहत्यांची गर्दी
08:54 AM : लोखंडवाला परिसरातील महाराणा प्रताप रोड पोलिसांनी काही वेळासाठी बंद केला आहे. श्रीदेवी यांच्या घरी जाणारा हा रास्ता असून चाहत्यांची उसळणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून ही उपाययोजना आखण्यात आली आहे.
श्रीदेवी यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त
श्रीदेवी यांच्या तामिळनाडूतील मूळ गाव मीनामप्पती येथे दुःखाचा डोंगर, श्रीदेवी यांचे निधन झाले आहे, यावर विश्वास बसत नसल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया
व्हिडीओ : श्रीदेवींचे पार्थिव दुबईहून मुंबईत दाखल