मुंबई - आपल्या शानदार अभिनयानं सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या बॉलिवूडमधील 'ख्वाबो की शहेजादी' श्रीदेवी यांची आयुष्याच्या पडद्यावरुन झालेली अकाली एक्झिट 'सदमा' देणारी आहे. शनिवारी ( 24 फेब्रुवारी ) रात्री दुबईमधील हॉटेलमध्ये कार्डिअॅक अरेस्टने त्यांचे निधन झाले. मात्र, आरोग्याच्या बाबतीत त्या अगदी फीट असल्याचं बोलले जात आहे. मृत्यूपूर्वीचा व्हायरल झालेल्या श्रीदेवींच्या व्हिडीओमध्येही त्या पती बोनी कपूर यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत.
श्रीदेवी यांच्या मृत्यूमागील कारण सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया असल्याची चर्चा सुरू आहे. स्वतःला चिरतरुण ठेवण्यासाठी श्रीदेवी या मोठ्या प्रमाणात अॅन्टी एजिंग औषधांचं सेवन करत होत्या. शिवाय, त्यांनी जवळपास 29 शस्त्रक्रियादेखील केल्या होत्या. यातील एक शस्त्रक्रिया यशस्वी न झाल्यानं श्रीदेवी यांना अनेक वेदनादेखील सहन कराव्या लागल्या होत्या. या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी श्रीदेवी साऊथ कॅलिफॉर्नियातील एका कॉस्मेटिक सर्जनच्या देखरेखी अंतर्गत उपचार घेत होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या 'डाएट पिल्स'चे सेवन करत होत्या.
श्रीदेवी यांनी आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठीदेखील उपचार केले होते. चेहरा चिरतरुण दिसावा यासाठी त्या बोटॉक्सचाही वापर करत होत्या. ओठांची शस्त्रक्रिया केल्याच्या वृत्तामुळेही गेल्या काहीदिवसांपासून श्रीदेवी चर्चेत होत्या. मात्र हे वृत्त त्यांनी फेटाळून लावले होते. श्रीदेवी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्यासंदर्भात डॉक्टरांचं असं म्हणणे आहे की, मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. पुरुष व महिलांमधील हृदयविकारांचे प्रमाण 3: 1 असे असते. मात्र महिलांची मासिक पाळी बंद झाल्यानं हे प्रमाण समान होते.
सर्जरीमुळे श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे सांगणाऱ्या नेटकऱ्यांना एकता कपूरने झापलं
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूनंतर आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या नेटकऱ्यांना निर्माती एकता कपूरने चांगलेच फटकारले आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियांच्या अतिरेकामुळे झाला आहे, अशा आशयाचे पोस्ट अनेक ट्विटरवरील युजर्संनी केले होते. यावरुन एकता कपूर नेटीझन्सवर संतापल्या. प्रत्युत्तर देताना एकता कपूर यांनी म्हटले की, विकृत विचारांच्या लोकांना मी सांगू इच्छिते की, हृदयाची कोणतीही व्याधी नसणाऱ्या काही लोकांनाही (1 टक्के) कार्डिअॅक अरेस्ट येऊ शकतो. माझ्या डॉक्टरांशी बोलून मी याबद्दलची खातरजमा केली आहे. हे सर्व विधीलिखीत होते. त्यामुळे श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामध्ये काहीच तथ्य नाही, असे एकताने म्हटले आहे.
श्रीदेवींची 'ती' शेवटची 30 मिनिटंमृत्यूच्या आधी अर्धा तासाचा वेळ श्रीदेवीने पती बोनी कपूर यांच्याबरोबर घालवला होता. दुबईतील लग्नसोहळा आवरून बोनी कपूर मुंबईत परतले होते. पण श्रीदेवी यांना सरप्राइज डिनर देण्यासाठी ते पुन्हा दुबईला गेले. पती बोनी कपूर यांच्याबरोबर डिनर डेटवर जाण्यासाठी श्रीदेवी तयार व्हायला बाथरूममध्ये गेल्यावर त्यांना कार्डिअॅक अरेस्टचा झटका आला होता. त्यानंतर श्रीदेवी बाथरूममध्येच पडल्या. जवळपास 15 मिनिटं त्या आतच होत्या. बराच वेळ होऊनही श्रीदेवी बाहेर न आल्याने बोनी कपूर यांनी दरवाजा वाजवला. पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्याने वॉशरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये श्रीदेवी बेशुद्धावस्थेत होत्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला व तरीही त्या शुद्धीवर न आल्याने बोनी कपूर यांनी त्यांच्या मित्राला फोन केला. रात्री नऊ वाजता यासंदर्भातील माहिती पोलिसांना समजली.
श्रीदेवी सहकुटुंबासह दुबईमध्ये भाचा मोहीत मारवाह याच्या विवाहासाठी गेल्या होत्या. श्रीदेवी, पती बोनी कपूर व मुलगी खुशी तिघेही दुबईत होते. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी सिनेमातील शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने लग्नाला गेली नव्हती. लग्नसोहळ्यानंतर पती व मुलगी मुंबईला परतले पण शॉपिंग व बहिणीबरोबर राहण्यासाठी श्रीदेवी दुबईत थांबल्या होत्या.
3 वर्षांपूर्वी बचावल्या होत्या3 वर्षांपूर्वी एका भीषण अग्निकांडातून श्रीदेवी थोडक्यात बचावल्या होत्या. ही आग इतकी भीषण होती की, त्यात श्रीदेवी यांचा बेडही जळून खाक झाला होता. नोव्हेंबर २०१३ सालची ही घटना. श्रीदेवी व बोनी कपूर यांच्या अंधेरीस्थित बंगल्याला संध्याकाळी अचानक आग लागली. ही आग लागली, तेव्हा श्रीदेवी दोन्ही मुली जान्हवी व खुशीसोबत बंगल्यात होत्या. सुदैवाने तिघींनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यशआले होते.