'सृजन' सादर करणार पारितोषिक विजेत्या एकांकिका

By संजय घावरे | Published: May 11, 2024 05:51 PM2024-05-11T17:51:07+5:302024-05-11T17:51:46+5:30

१५ मे रोजी सृजन - द क्रिएशनचा चौथा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. यानिमित्त प्राबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह येथे रात्री ८ वाजता विठ्ठल सावंत आणि राजेश देशपांडे लिखित 'तीनसान' आणि 'श्यान पण, देगा देवा' या दोन एकांकिकांचे प्रयोग होणार आहेत.

'Srijan' will present the award winning one act | 'सृजन' सादर करणार पारितोषिक विजेत्या एकांकिका

'सृजन' सादर करणार पारितोषिक विजेत्या एकांकिका

मुंबई - लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजेश देशपांडे यांनी लॅाकडाऊनमध्ये नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सृजन - द क्रिएशन हि संस्था सुरू केली होती. या संस्थेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्त दोन पारितोषिक विजेत्या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत.

१५ मे रोजी सृजन - द क्रिएशनचा चौथा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. यानिमित्त प्राबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह येथे रात्री ८ वाजता विठ्ठल सावंत आणि राजेश देशपांडे लिखित 'तीनसान' आणि 'श्यान पण, देगा देवा' या दोन एकांकिकांचे प्रयोग होणार आहेत. मराठी नाट्य रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन राजेश देशपांडे यांनी केले आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरातील सृजनशील माणसांचे कुटुंब बनले. मागील चार वर्षांमध्ये या संस्थेतील कलाकारांनी जवळपास २५ एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटके, अनेक अभिजात नाटकांचे अभिवाचन आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. अनेक प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत.

Web Title: 'Srijan' will present the award winning one act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई