श्रीनिवास यांच्याकडे ‘धारावी’ तर सुरेंद्र बागडेंकडे ‘बेस्ट’ची धुरा

By admin | Published: April 23, 2017 03:29 AM2017-04-23T03:29:32+5:302017-04-23T03:29:32+5:30

गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावरच अस्तित्वात असलेल्या धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या प्रमुखपदी एसआरव्ही श्रीनिवास यांची तर आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘बेस्ट’च्या

Srinivas has Dharavi and Surendra Bagad has the best bowl | श्रीनिवास यांच्याकडे ‘धारावी’ तर सुरेंद्र बागडेंकडे ‘बेस्ट’ची धुरा

श्रीनिवास यांच्याकडे ‘धारावी’ तर सुरेंद्र बागडेंकडे ‘बेस्ट’ची धुरा

Next

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावरच अस्तित्वात असलेल्या धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या प्रमुखपदी एसआरव्ही श्रीनिवास यांची तर आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकाची धुरा सुरेंद्र बागडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मुंबईच्या शहर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाची नेमणूक करण्यात आलेली नाही.
राजीव गांधी आरोग्य योजनेच्या मुख्य अधिकारीपदी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडे यांची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने राज्यभरात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ६० सनदी अधिकाऱ्यांच्या शनिवारी बदल्या केल्या. त्यामध्ये मुंबईतील सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे अशी ( कंसात नव्या नियुक्तीचे पद) : एसआरव्ही श्रीनिवास -‘सिकॉम’ (धारावी पूर्नविकास प्राधीकरण), सुरेंद्र बागडे - समाज कल्याण विभाग (बेस्ट), अश्विनी जोशी - मुंबई शहर जिल्हाधिकारी (आयुक्त एक्साईज), दिलीप शिंदे - महानंदा (नियंत्रक, रेशनिंग व नागरी पुरवठा), निधी पांडे - औरंगाबाद (मुख्य अधिकारी, राजीव गांधी आरोग्य योजना), ए.ए. गुलाने - सचिव उर्जामंत्री (सहमुख्य अधिकारी, एमआयडीसी), सी.के. डांगे - उपमुख्याधिकारी, म्हाडा (अतिरिक्त आयुक्त , अदिवासी समिती, ठाणे )

Web Title: Srinivas has Dharavi and Surendra Bagad has the best bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.