"दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात", आशिष शेलार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 18:47 IST2021-04-09T18:38:16+5:302021-04-09T18:47:49+5:30
SSC And HSC exams And Ashish Shelar : कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परिक्षा घ्याव्यात असं भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटलं आहे.

"दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात", आशिष शेलार यांची मागणी
मुंबई - राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावीची परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परिक्षा घ्याव्यात असं भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटलं आहे. राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परिक्षांबाबत काय करावे? याबाबत आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली.
आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडतांना सांगितले की, कोविडची सध्याची भयावह स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या सोबतच सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्याची सुध्दा काळजी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्य स्थितीमध्ये परिक्षांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुन्हा आढावा बैठक घेऊन योग्य वेळी परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात. आता शासनाने अधिक विलंब न करता निर्णय तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे, जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.