SSC Exam : 'राज्यातील दहावीच्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार, लवकरच होईल निर्णय'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 06:24 PM2021-04-14T18:24:55+5:302021-04-14T18:36:00+5:30

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली असून, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

SSC Exam : 'We will discuss with the experts about the 10th standard examination in the state, a decision will be taken soon', varsha gaikwad on education exam | SSC Exam : 'राज्यातील दहावीच्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार, लवकरच होईल निर्णय'

SSC Exam : 'राज्यातील दहावीच्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार, लवकरच होईल निर्णय'

googlenewsNext
ठळक मुद्देदहावीच्या परीक्षा जूनमध्ये, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्यांत होणार आहेत. त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत दिल्या.

मुंबई - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन राज्यातील दहावी आणि बारावी राज्य मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर, आता सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य मंडळाच्या दहावीच्या परिक्षाबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याच शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी सांगितलं. 

दहावीच्या परीक्षा जूनमध्ये, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्यांत होणार आहेत. त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत दिल्या. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली असून, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शाळांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात आणि राज्य सरकारच्या नियमावलींचे पालन करण्याची विनंती केली होती. आता, सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य मंडळाच्या दहावीच्या परिक्षांबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाविषयी विचार व चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करणार, असेही शिक्षणमंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. 

10 वी अन् 12 वी साठी नवीन तारखा जाहीर होणार

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक सोमवारी घेण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत आपले आरोग्य हीच आपली प्राथमिकता असल्याने दहावी, बारावीच्या राज्यातील तब्बल ३० लाख विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या प्रवेशाचे वेळापत्रक लक्षात घेऊन दहावी, बारावीच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येईल व नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सगळ्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय
विद्यार्थी शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक, शिक्षणतज्ज्ञ या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे, तसाच तो इतर परीक्षा मंडळांना कळवला जाईल आणि त्यांनीही आपल्या परीक्षांच्या तारखांबाबत फेरविचार करावा, असे विनंती पत्र दिले जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

कार्यप्रणाली निश्चित करण्याचे दिले निर्देश
परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, तसेच याची एक परिपूर्ण कार्यप्रणाली (एसओपी) शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

- ज्या तारखांना १२च्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात, यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. 
- केंद्रांची संख्या वाढवावी, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात, मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवावे, परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे.

‘परीक्षा सुधारित कार्यक्रमानुसारच घ्या’
बारावीच्या परीक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करताना बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे आयआयटी, जेईई आणि नीटच्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचे असतात, हे लक्षात घ्यावे. त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या.
 

Web Title: SSC Exam : 'We will discuss with the experts about the 10th standard examination in the state, a decision will be taken soon', varsha gaikwad on education exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.