SSC, HSC Exams : मोठी बातमी! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेबाबत पुढील दोन दिवसांत जारी होणार मार्गदर्शक सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:59 PM2021-03-18T15:59:04+5:302021-03-18T16:00:39+5:30
SSC, HSC Exams Date Update : कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील दोन दिवसात बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल मे 2021 परीक्षेचे आयोजन करताना इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान तर बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान प्रचलित पद्धतीने व मंजूर आराखड्यानुसार आयोजित करण्यात आली आहे. (SSC, HSC Exams Date Update) शिवाय, कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील दोन दिवसात बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. (Guidelines for 10th and 12th board exams will be issued in next two days)
तसेच इयत्ता दहावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 12 एप्रिल ते 28 एप्रिल 2021 दरम्यान इयत्ता बारावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 5 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत. राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. या अनुषंगाने उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्यासोबत विविध समाज माध्यम, प्रसारमाध्यमात इयत्ता दहावी बारावी परीक्षेत संदर्भात विविध बातम्या , असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे