दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 06:07 AM2024-05-28T06:07:17+5:302024-05-28T06:08:11+5:30

मुंबईतून खासगीरीत्या बसलेल्या १४,५३२ विद्यार्थ्यांपैकी ११,४१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

SSC Result Mumbai division percentage increased There was an increase of two percent the passing rate of girls was higher | दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी

दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर यांचा समावेश असलेल्या मुंबई विभागाचा दहावीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वधारला आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल ९३.६६ टक्के इतका लागला आहे. यंदा निकालात ९५.८३ टक्के इतकी वाढ झाली आहे. इतर विभागांच्या तुलनेत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

यंदा मुंबईतून नियमित ३,३९,२६९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३,२५,१४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे ९६.९५ टक्के आणि मुलांची ९४.७७ टक्के आहे.

परीक्षेला बसलेल्या एकूण मुली : १,६५,४२३
उत्तीर्ण - १,६०,३८१

परीक्षेला बसलेले एकूण मुले : १,७३,८४६
उत्तीर्ण - १,६४,७६२

खासगी विद्यार्थ्यांचा निकाल - ७८.५७%

मुंबईतून खासगीरीत्या बसलेल्या १४,५३२ विद्यार्थ्यांपैकी ११,४१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  हा निकाल ७८.५७ टक्के इतका आहे. यातील ४०८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर २,५२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: SSC Result Mumbai division percentage increased There was an increase of two percent the passing rate of girls was higher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.