मुंबईत ९० टक्केवाले वाढले, आठ विद्यार्थ्यांना १०० टक्के; ठाण्यातील मुलगी अव्वल

By रेश्मा शिवडेकर | Published: May 27, 2024 06:54 PM2024-05-27T18:54:35+5:302024-05-27T18:54:47+5:30

ठाण्याच्या ए. के. जोशी शाळेच्या अनुष्का काळे हिनेही १०० टक्के गुण मिळवत आपल्या यशात शाळेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

SSC Resut: In Mumbai, 90 percentiles student increase, eight students to 100 percent; The girl from Thane is the top | मुंबईत ९० टक्केवाले वाढले, आठ विद्यार्थ्यांना १०० टक्के; ठाण्यातील मुलगी अव्वल

मुंबईत ९० टक्केवाले वाढले, आठ विद्यार्थ्यांना १०० टक्के; ठाण्यातील मुलगी अव्वल

मुंबई  - मुंबई विभागातून उत्तीर्ण झालेल्या ३.२५ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार टक्के म्हणजे १३,४३० विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १,६४५ने वाढली आहे. तर आठ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले आहेत.

ठाण्याच्या नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कुलच्या अनन्या कुलकर्णी हिने १०० पैकी १०० गुण मिळवत अव्वल कामगिरी केली आहे. भरतनाट्यातून आपली नृत्याची आवड जोपासत तिने ही कामगिरी केली आहे. अनन्याला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. आपल्या यशात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले. मुख्य म्हणजे अभ्यास सुरु असताना तिने आपले छंदही जोपासले.

ठाण्याच्या ए. के. जोशी शाळेच्या अनुष्का काळे हिनेही १०० टक्के गुण मिळवत आपल्या यशात शाळेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. तिला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचे आहे. अभ्यासाबरोबरच अन्य उपक्रमांमध्ये भाग घेणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले.

अनन्या आणि अनुष्का हिच्याप्रमाणे अव्वल कामगिरी करणाऱया मुंबईच्या खुशी शिंदे हिनेही आपली चित्रकला आणि कथकचा छंद जोपासत यश मिळविले. स्वयंअध्ययन आणि सराव हे आपल्या यशाचे सूत्र असल्याचे तिने सांगितले. खुशीच्या आई संस्कारधाम ज्युनिअर कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या शिक्षका आहेत. अभ्यासात आईची खूप मदत झाल्याचे तिने सांगितले. चित्रकला आणि नृत्यामुळे अभ्यासाचा ताण हलका होण्यास मदत झाली. तिलाही विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा आहे.

३० टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

मुंबईतील ३० टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबईतून ९७,३५४ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. 

टक्केवारीनिहाय निकाल

९० आणि त्याहून अधिक - १३,४३०

८५ ते ९० - २१,५४१

८० ते ८५ - २८,८१९

७५ ते ८० - ३३,९७६

७० ते ७५ - ३७,५५७

६५ ते ७० - ३९,४१७

६० ते ६५ - ४३,६०

४५ ते ६० - ८८,८०३

४५ पेक्षा कमी - ३२,२९०

मुंबईतील ९० टक्केवाले

२०२४ - १३,४३०

२०२३ - ११,७८५

२०२२ - १०,७६४

२०२१ - १५,५५०

मुंबईतून १०० टक्के गुण मिळविणाऱयांमध्ये सात मुली

अनन्या कुलकर्णी (सरस्वती सेकंडरी स्कुल, ठाणे)

अनुष्का काळे (आनंदीबाई केशव जोशी इंग्लिश मिडियम स्कुल, ठाणे)

आर्या ढवळे (सिस्टर निवेदिता इंग्लिश मिडियम हायस्कुल, डोंबिवली)

खुशी शिंदे (डीएसआरव्ही, मालाड)

शार्वी महंते (कॅर्मेलाईट कॉन्व्हेन्ट हायस्कुल, वसई)

सृष्टी काळे (एनआरसी कॉलनी स्कुल, कल्याण)

प्रथमेश दाते (सिस्टर निवेदिता इंग्लिश मिडियम हायस्कुल, डोंबिवली)

पूर्वा शिर्के (कॅरमल कॉन्व्हेन्ट हायस्कुल, बदलापूर)

Web Title: SSC Resut: In Mumbai, 90 percentiles student increase, eight students to 100 percent; The girl from Thane is the top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.