मुंबई : ऐन दिवाळीत चार दिवस संप पुकारणा-या एसटी कामगारांना ३६ दिवसांच्या पगारावर पाणी सोडावे लागणार आहे. ‘ना काम ना वेतन’ यानुसार संप काळातील प्रत्येक दिवसासाठी ८ दिवसांचे वेतनकपात याप्रमाणे ३६ दिवसांचे वेतन कापण्यात येणार आहे.‘ना काम ना दाम’ या तत्त्वानुसार ४ दिवसांचे वेतन कपात करा, तसेच त्या व्यतिरिक्त झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून प्रत्येक दिवसासाठी ८ दिवस, याप्रमाणे एकूण ३६ दिवसांचे वेतन कपात करणे आवश्यक आहे. मात्र, कामगारांच्या वेतनातून करावयाच्या वैधानिक वजावटी आणि त्यांना दैनंदिन खर्चासाठी आवश्यक असणारे वेतन यांचा विचार करून, या ३६ दिवसांपैकी आॅक्टोबर महिन्यात ४ दिवसांची वेतन कपात करण्यात येणार आहे, तर उरलेल्या ३२ दिवसांची वेतन कपात पुढील ६ महिन्यांत करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्व विभाग आणि अधिकाºयांनी कार्यवाही करावी, असे महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या सहीचे हे परिपत्रक राज्यातील कार्यशाळा, प्रशिक्षण संस्था आणि विभाग नियंत्रक यांना पाठविण्यात आले आहे.महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी १७ ते २० आॅक्टोबर या कालावधीत संप पुकारण्यात आला होता. संपात सर्व पक्षीय संघटनांनी पाठिंबा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशील ठरवत, कर्मचाºयांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. वेतनप्रश्नी तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूककेली. करार संपून १८ महिन्यांचा कालावधी लोटला आहे.पगारवाढ मिळालेली नसताना आता पगार कापणार असल्यामुळे, कर्मचारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.कामगार संघटनेची महामंडळाला विनंतीकर्मचारी वेतन प्र्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण होईल, असे करणे योग्य नाही. ‘ना काम ना दाम’ या तत्त्वाप्रमाणे वेतनात कपात करण्याव्यतिरिक्त झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून, ८ दिवस वेतन कपात करण्याची कारवाई करू नये, अशी विनंती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे (मान्यताप्राप्त) महामंडळाला करण्यात आली आहे.संपकालीन गैरहजर राहिलेल्या कर्मचाºयांच्या वेतनातून ‘ना काम ना दाम’ या तत्त्वाप्रमाणे वेतनात कपात करण्याव्यतिरिक्त झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून ८ दिवसापर्यंतच्या वेतनात कपात करू नये, असे विनंती पत्र मान्यताप्राप्त संघटनेने पाठविले आहे. संप करणे हा कामगारांचा अधिकार आहे. प्रशासनाने कर्मचाºयांच्या पगार कपातीचा जो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मुंबई औद्योगिक न्यायालयात दाद मागणार आहे. - संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
एसटी संप ४ दिवस;पगार कपात ३६ दिवसांची! एसटी महामंडळ आक्रमक, परिपत्रक जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:23 AM