मुंबई : एसटी कामगारांची बँक असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को - ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकांनी घूमजाव केले आहे. एकीकडे ११ संचालकांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मनमानीचा आरोप करत बंडखोरी केली होती. परंतु, शुक्रवारी झालेल्या बैठकीत या संचालकांमध्ये फूट पडली, त्यातील २ संचालक सदावर्ते यांच्यासोबत गेल्याने त्यांचे बहुमत झाले आहे. एसटी बँकेच्या संचालकांसाठी निवडणुकीत सदावर्ते यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वच संचालक निवडून आले. मात्र, सदावर्ते यांचा बँकेच्या कारभारात हस्तक्षेप, मनमानी निर्णय यामुळे ११ संचालकांनी दंड थोपटत स्वतंत्र गट तयार केला होता. त्यामुळे त्यांच्या बँकेवरील वर्चस्वाला सुरुंग लागला होता. १९ संचालकांपैकी १० जणांनी ठरावाच्या विरोधात, तर नऊ जणांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
एसटी बँक निवडणुकीपूर्वी ठेवी - २,३०० कोटी सध्याच्या शिल्लक ठेवी- १,८५० कोटीकाढलेल्या ठेवी - ४५० कोटी सध्याचे कर्ज वाटप - १,६०० कोटी
एसटी बँकेचा कारभार बेकायदेशीरपणे सुरू आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर हे सदावर्ते यांच्या दबावाला बळी पडत आहेत. - आनंदराव अडसूळ, अध्यक्ष, को - ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनएसटी बँकेच्या संचालकांच्या बैठकीत बसण्याचा अधिकार सदावर्ते यांना नाही. त्यांच्या संचालकपदाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. तरी त्यांना बैठकीत सहभाग घेऊ दिला. डॉ. माधव कुसेकर यांचा पक्षपातीपणा आहे. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस