Coronavirus: अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी लालपरी धावली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 09:25 PM2020-03-24T21:25:28+5:302020-03-24T21:26:59+5:30

एसटी आणि बेस्ट बसेस कर्मचाऱ्यांच्या सेवेत

st best buses running for people who are giving emergency services | Coronavirus: अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी लालपरी धावली

Coronavirus: अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी लालपरी धावली

Next

 मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या  कर्मचाऱ्यांच्या दळणवळणाची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाची लालपरी व बेस्टची बस धावत आहे. 

राज्य सरकारने एसटी महामंडळ आणि बेस्ट प्रशासनाला अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार एसटीने मंत्रांलयीन कर्मचाऱ्यांची ने - आण करण्यासाठी मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली व कल्याण (सकाळी ८:००, ८:१५) येथून; पश्‍चिम रेल्वेमार्गावरील नालासोपारा व विरार (सकाळी ७:००,७:१५) येथून थेट मंत्रालयासाठी बसची सोय केली आहे. 

बेस्टच्या वतीने बोरीवली स्टेशन -मंत्रालय (८:००,८:३०),शासकीय वसाहत बांद्रा- मंत्रालय(८:३०,९:००) पनवेल एसटी स्टँड -मंत्रालय (७:३०,८:३०) ठाणे कॅडबरी जंक्शन- मंत्रालय (८:००,८:३०)डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर- मंत्रालय(८:३०,९:००) विक्रोळी डेपो- मंत्रालय(८:३०,९:००)पि.के.खुराणा चौक वरळी - मंत्रालय(८:४५,९:००) येथून बसेस सुटतील.

बृहन्मुंबई महापालिका, शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार,पोलीस, विविध बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी इत्यादी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकाहून आणि मुंबईतील  बोरिवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत एसटीच्या  बस  दर ५ मिनिटांला या प्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.  या बस डोंबिवली-ठाणे, पनवेल-दादर, पालघर-बोरिवली,  विरार- बोरिवली, टिटवाळा-ठाणे, आसनगाव- ठाणे,  कल्याण- ठाणे, कल्याण -दादर,  बदलापूर -ठाणे  नालासोपारा- बोरिवली या मागॊवर धावत आहेत. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाशी, ठाणे (खोपट) व दादर येथून शहरांतर्गत आपल्या कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट बसची सेवा एसटीच्या बस ना पूरक अशा पद्धतीने जोडण्यात आली आहे, तरी या सेवेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी व बेस्ट प्रशासनाने केले आहे.

Web Title: st best buses running for people who are giving emergency services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.