मुंबई - एसटी चालक आणि वाहकांसाठी एसटी महामंडळानं नवीन वर्षाची भेट दिली आहे. 10 ते 15 वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल 3 हजार 307 एसटी कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी बदली देऊन एसटी महामंडळानं दिलासा दिला आहे.
बदलीसाठी अर्ज केलेले बहुतांश कर्मचारी हे कोकणात नोकरीनिमित्त कार्यरत होते. महाराष्ट्रातील विविध भागातील कर्मचारी कोकणात कायमस्वरुपी नोकरी करण्यास फारसे उत्सुक नसतात. कोकण विभागातील नोकरीची जाहिरात आली की सर्व जण अर्ज करतात. पण नोकरीसाठी रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बदलीसाठी अर्ज करतात, अशी उदाहरणे समोर आली आहेत.
या पार्श्वभूमीवर, गेल्या 15 वर्ष बदलीचा अर्ज करुन प्रतीक्षा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी इच्छित स्थळी बदली देऊन सुखक धक्का दिला आहे.