Join us  

ST Bus: एसटीच्या ताफ्यात येणार इलेक्ट्रिक आणि डिझेल बस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:20 AM

ST Bus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक, तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक, तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्याटप्प्याने ‘एलएनजी’मध्ये रूपांतर करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यासही मान्यता देण्यात आली. महामंडळाचे ९२ हजार अधिकारी-कर्मचारी असून, त्यांना पूर्वी मिळणारा २८ टक्के महागाई भत्ता आता ३४ टक्के दराने मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक शुक्रवारी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार उपस्थित होते. पुणे व सांगली विभागाकरिता १८० बस भाडेतत्त्वावर घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. \

nडिझेलवर धावणाऱ्या पाच हजार बसगाड्यांचे एलएनजी इंधनामध्ये रूपांतरण करण्यात येणारnसेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणाऱ्या अतिरिक्त उपदान लाभाची मर्यादा ६ लाख १५ हजारांवरून ७ लाख ५ ह. nअँड्राॅइडवर आधारित ईटीआय यंत्राद्वारे प्रवाशांना डेबिट, क्रेडिट कार्ड, गुगल पे आदी ऑनलाइन पेमेंटद्वारे आता तिकिटे

टॅग्स :एसटी