पावसाळ्यापूर्वी एसटी बसस्थानके खड्डेमुक्त; आगारात स्वच्छता मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 06:49 AM2023-05-22T06:49:04+5:302023-05-22T06:49:18+5:30

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी  विभाग नियंत्रकांना २० मे ते ३० मे  या कालावधीमध्ये बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

ST bus stands pothole-free before monsoon; Cleaning campaign started in Agar | पावसाळ्यापूर्वी एसटी बसस्थानके खड्डेमुक्त; आगारात स्वच्छता मोहीम सुरू

पावसाळ्यापूर्वी एसटी बसस्थानके खड्डेमुक्त; आगारात स्वच्छता मोहीम सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळाच्या अनेक बसस्थानक परिसरात खड्डे पडले आहेत. सध्या या खड्ड्यांमुळे धुळीचे साम्राज्य असून, पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून बसस्थानकात एसटी बसची वाट पाहत थांबणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्याचबरोबर अनेक एसटी बसस्थानके अस्वच्छ अवस्थेत आढळून येतात. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी बसस्थानक परिसरातील खड्डे बुजवावे, असे  निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. 

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी  विभाग नियंत्रकांना २० मे ते ३० मे  या कालावधीमध्ये बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. एसटीची राज्यभरात ५८० पेक्षा जास्त बसस्थानके आहेत. एसटीची दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या ५३ लाख आहे. यापैकी बहुतेक  एसटीच्या बसस्थानकांची स्थिती फार चांगली नाही. १ मेपासून एसटीने स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून सर्व परिसर चिखलमय होऊन होतो. बसेस बसस्थानकातून  आत-बाहेर पडताना हेच चिखलयुक्त पाणी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याचे आढळले आहे. 

डेब्रिज, मातीचे ढीग उचलणार
     बसस्थानक आणि बसस्थानक परिसरातील अनावश्यक डेब्रिज, मातीचे ढीग, साचलेला कचरा, लाकडाचे ओंडके, दगड-गोटे काढणार.
     बसस्थानक परिसरात वाहतुकीला आणि प्रवाशांना अडचणीचे खड्डे बुजविणार.
     बसस्थानकाच्या मुख्य इमारतीतील छताला व उंच भिंतीला साचलेली जळमटे, भिंतीवर चिटकविलेली. स्टिकर, मुदत व कालबाह्य झालेले कापडी फलक, जाहिराती काढून टाकणार.
     बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृह निजंतुक करून स्वच्छतागृहात भिंतीवर असलेले डाग पुसणार.
     बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृह विविध व्यापारी आस्थापना यांच्या भिंतीच्या कडेला साचलेला जुनाट कचरा साफ करून तेथे निर्जंतूक पावडर फवारले जाणार.

Web Title: ST bus stands pothole-free before monsoon; Cleaning campaign started in Agar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.