Join us

मध्यरात्रीपासून एसटीची 18 टक्के भाडेवाढ लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 8:39 AM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषित केलेली 18 टक्के भाडेवाढ शुक्रवारी(15 जून) मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषित केलेली 18 टक्के भाडेवाढ शुक्रवारी(15 जून) मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. डिझेलचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनकरारामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने कळविले आहे. सुट्ट्या पैशांचा वाद मिटविण्यासाठी एसटी महामंडळाने पाचच्या पटीत तिकीट आकारण्याच्या निर्णय घेतला आहे. परिणामी, 7 रुपयांच्या तिकिटांसाठी 5 रुपये आणि 8 रुपयांच्या तिकिटांसाठी 10 रुपये आकारण्यात येतील, अशी माहिती महामंडळाने दिली.

दरम्यान,  या दरवाढीच्या योग्य अंमलबजावणीसाठी 15 ते 18 जून या कालावधीत एसटीच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून मुख्यालयात हजर राहण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :राज्य परीवहन महामंडळमहाराष्ट्र