नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सातवा वेतन आयोग आणि विलीनीकरण या मागण्यांसाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबर पासून एसटी संपाची हाक दिली होती. पण त्याकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली असून एसटी वाहतूक सुरळीत आहे.
महाराष्ट्रातील २५० आगारातील सकाळी ७ वाजेपर्यंत च्चा सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत.(रात्र वस्तीचे सर्व मुक्काम आपल्या नियोजित थांब्यावरुन निघाले आहेत.)कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे असे एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान या संपावरून आता एसटी कर्मचारी संघटनांमध्येच जुंपली आहे. सदावर्ते यांनी साडे पाच महिन्यांचा संप मागे घेताना सातवा वेतन आयोग मिळाला असा दावा केला होता तर आता पुन्हा का सातवा वेतन आयोग मागत आहेत असा सवाल करत तर लबाडी करत असल्याचा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेस आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने केला आहे.