कंत्राटी चालक नेमण्यास एसटी महामंडळाची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 10:28 AM2022-07-24T10:28:16+5:302022-07-24T10:30:16+5:30

राज्यात २९ हजारांपेक्षा जास्त एसटीचालक आहेत.

ST Corporation extends deadline for appointment of contract drivers | कंत्राटी चालक नेमण्यास एसटी महामंडळाची मुदतवाढ

कंत्राटी चालक नेमण्यास एसटी महामंडळाची मुदतवाढ

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संपकाळात चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले. या कालावधीत एसटी महामंडळाकडून कंत्राटीचालक भरती करून राज्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रपूर, ठाणे आणि बुलडाणा विभागास कंत्राटीचालक पुरविण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्यात २९ हजारांपेक्षा जास्त एसटीचालक आहेत. काही चालक अन्य विभागात बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनंतर पुन्हा मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. याबाबत महाव्यवस्थापक (वाहतूक) सुहास जाधव यांनी आदेशात म्हटले आहे की, मुदतवाढ आदेशाची मुदत संपल्याने चंद्रपूर, ठाणे, बुलडाणा व अकोला या विभागास अनुक्रमे ५०, १००, १०० आणि ५० कंत्राटी चालकांना  २० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: ST Corporation extends deadline for appointment of contract drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.