एसटी महामंडळाचा १० हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 05:53 AM2020-02-19T05:53:48+5:302020-02-19T05:54:01+5:30

२ हजार नवीन बस खरेदी करणार; ६०० कोटी रुपयांची तरतूद

ST Corporation has a budget of Rs | एसटी महामंडळाचा १० हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प

एसटी महामंडळाचा १० हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प

googlenewsNext

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या २०२०-२१ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात (अंदाजित) १० हजार ४६७ कोटी रुपयांची मंजुरी एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी राज्य परिवहन महामंडळ संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दिली. यामध्ये २ हजार नवीन बस, ६६ ठिकाणी बस स्थानकांच्या दर्जात वाढ, आगाराचे बांधकाम केले जाईल. २० मिडी बस भीमाशंकर देवस्थान विकास आराखड्याअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.

२०२०-२१ च्या आगामी वर्षात २ हजार साध्या बस खरेदीसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. १ हजार ३४२ जुन्या बस माइल्ड स्टीलमध्ये पुनर्बांधणी करण्याकरिता १७४.४६ कोटी, ६०० साध्या जुन्या बसच्या चॅसीसला माइल्ड स्टीलमध्ये बांधणीसाठी ७१.४० कोटींची तरतूद केली जाईल. २०१९-२० या वर्षात ७०० नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. यासाठी सरकारने ११० कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे.
अर्थसंकल्पात राज्य शासनाकडून बस स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी १३४.८९ कोटी रुपये, कर्मचारी वेतनावरील खर्च ४ हजार ३८३ कोटी रुपये, इंधनासाठी ३ हजार ३८५ कोटी रुपये, टोल टॅक्ससाठी १५४.१७ कोटी रुपये, स्वच्छतेसाठी ७९.३८ कोटी, वीज बिल, पाणी बिल, यंत्रसामग्री देखभालीसाठी २४९.८८ कोटी, प्रवासी कर व मोटर कर यासाठी ११५२.४८ कोटी तर, सीसीटीव्हीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या प्रकल्पांसाठी विशेष तरतूद
च्प्रवासी तक्रार निवारणासाठी कॉल सेंटर २४ तास सुरू राहणार.
च्महाआॅनलाइनमार्फत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध.
च्सीसीटीव्ही, वाहन शोध प्रणाली, प्रवासी माहिती प्रणाली, बस फेऱ्यांचा वक्तशीरपणा तपासण्यासाठी व्ही.टी.एस.चा वापर करण्यात येईल.
च्चालक-वाहक विश्रांतीगृहांचे आधुनिकीकरण.
च्आधुनिक बस स्थानके, नवीन स्वच्छतागृहे, संगणकीय उद्घोषणा सुरू करण्यात येतील.

Web Title: ST Corporation has a budget of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई