ST महामंडळाची मुंबई ते गोवा बससेवा सुरू, पर्यटकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 02:50 PM2020-12-09T14:50:25+5:302020-12-09T14:52:13+5:30

मुंबईतून ही बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी ४.३० वाजता तर पणजी येथून संध्याकाळी ४.०० वाजता बस सुटणार आहे.

ST Corporation launches Mumbai to Goa bus service, a relief to tourists | ST महामंडळाची मुंबई ते गोवा बससेवा सुरू, पर्यटकांना दिलासा

ST महामंडळाची मुंबई ते गोवा बससेवा सुरू, पर्यटकांना दिलासा

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतून ही बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी ४.३० वाजता तर पणजी येथून संध्याकाळी ४.०० वाजता बस सुटणार आहे.

मुंबई : नाताळच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल-पणजी अशी शयन-आसनी बस सेवा ९ डिसेंबर पासून सुरु केली आहे. मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या प्रवासांची या बसमुळे चांगलीच सोय होणार आहे. या बसमध्ये आसन आणि शयन सीटची व्यवस्था आहे. त्यामुळे प्रवाशांनी आधीच बुकिंग केल्यास त्यांना आरक्षित सीट मिळू शकेल.  

मुंबईतून ही बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी ४.३० वाजता तर पणजी येथून संध्याकाळी ४.०० वाजता बस सुटणार आहे. तसेच हि बस आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच अॅपवरही उपलब्ध आहे. तरी सदर बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात येत आहे. 


        
तिकीट दर  
मुंबई सेंट्रल-  पणजी   ९६५  , 
मुंबई सेंट्रल-  म्हापसा   ९५० ,  
मुंबई सेंट्रल-   बांदा  ८९५ , 
मुंबई सेंट्रल-   सावंतवाडी ८७५ ,  मुंबई सेंट्रल-   कणकवली ७८५

Web Title: ST Corporation launches Mumbai to Goa bus service, a relief to tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.