कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची २४०० कोटींची देणी थकली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 03:05 AM2021-05-04T03:05:56+5:302021-05-04T03:06:33+5:30

एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डिझेल, स्पेअर पार्टची देणी थकल्याने त्याचा वाहतुकीला फटका बसू शकतो. राज्यात काही आगारात डिझेलअभावी एसटी वाहतुकीला अडचणी आल्या होत्या

ST Corporation owes Rs 2,400 crore | कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची २४०० कोटींची देणी थकली

कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची २४०० कोटींची देणी थकली

googlenewsNext
ठळक मुद्देएसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डिझेल, स्पेअर पार्टची देणी थकल्याने त्याचा वाहतुकीला फटका बसू शकतो. राज्यात काही आगारात डिझेलअभावी एसटी वाहतुकीला अडचणी आल्या होत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे, एसटीचे स्पेअर पार्ट, डिझेल अशा खर्चाचे एकूण २४०० कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. जर पुरवठादारांची देणी दिली नाही तर एसटीच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डिझेल, स्पेअर पार्टची देणी थकल्याने त्याचा वाहतुकीला फटका बसू शकतो. राज्यात काही आगारात डिझेलअभावी एसटी वाहतुकीला अडचणी आल्या होत्या. गेल्यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले. त्यामुळे आर्थिक चक्र ठप्प झाले होते. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही राज्य सरकारला निधी द्यावा लागला होता. सध्या सरकारलाही अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी एसटीचे उत्पन्न सात ते आठ हजार कोटी होते. गेल्यावर्षीचे उत्पन्न ३१०० कोटींवर आले. गेल्या वर्षी मजूर, अत्यावश्यक सेवेची वाहतूक, मालवाहतूक याचा फायदा एसटीला झाला होता. एसटीचे दररोजचे उत्पन्न २ कोटींवर आले आहे. दरवर्षी ३६०० कोटी वेतनासाठी लागतात; पण गेल्यावर्षी ३१०० कोटी उत्पन्न झाले असले तरी यावर्षी हा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या सर्वांगीण विकासात एसटीचा मोठा वाटा आहे. आजपर्यंत विविध करांच्या रूपात ७० वर्षांत करोडो रुपये राज्य व केंद्र शासनाला एसटीने दिले आहेत. लॉकडाऊनमुळे एसटी आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे एसटीला आर्थिक मदत करणे हे सरकारचे कर्तव्य असून ते सरकारने पार पाडले पाहिजे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
 

Web Title: ST Corporation owes Rs 2,400 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.