राज्य सरकारच्या अवजड, मोठ्या प्रवासी वाहनांचे पुनस्तरण एसटी महामंडळ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:07 AM2021-05-22T04:07:03+5:302021-05-22T04:07:03+5:30

मुंबई : एसटी महामंडळातर्फे राज्य भरात नऊ ठिकाणी टायर पुनस्तरण करण्याचे संयत्र सुरू आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या विविध ...

The ST Corporation will replace the state government's heavy, bulky passenger vehicles | राज्य सरकारच्या अवजड, मोठ्या प्रवासी वाहनांचे पुनस्तरण एसटी महामंडळ करणार

राज्य सरकारच्या अवजड, मोठ्या प्रवासी वाहनांचे पुनस्तरण एसटी महामंडळ करणार

Next

मुंबई : एसटी महामंडळातर्फे राज्य भरात नऊ ठिकाणी टायर पुनस्तरण करण्याचे संयत्र सुरू आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या विविध उपक्रमाच्या ५० टक्के अवजड व मोठ्या प्रवासी वाहनांचे पुनस्तरण करण्याचे काम एसटी महामंडळाला देण्यात आलेले आहे. याचबरोबर शासकीय अवजड व मोठ्या प्रवासी वाहनांची देखभाल व दुरुस्ती एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेमार्फत करण्यात येणार आहे. उपरोक्त निर्णयामुळे अर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला महसुलाचा शाश्वत स्त्रोत निर्माण झाला आहे.

या निर्णयामुळे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, अर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला महसुलाचा शाश्वत स्त्रोत निर्माण झाला आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केला होता. या निर्णयामुळे २३ मार्च २०२० पासून प्रवासी वाहतूक बंद होती. परिणामी प्रवासीसंख्या घटल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. तसेच कडक निर्बंधामुळे सर्व सामान्यांना लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तूंचा तसेच इतर मालांच्या वाहतुकीवर विपरित परिणाम झाला होता. अर्थिकदृष्ट्या अडचणित सापडलेल्या महामंडळाला बाहेर काढण्यासाठी परब यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत महामंडळाने उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये व्यावसायिक तत्त्वावर माल वाहतूक करणे, डिझेल-पेट्रोल पंप सुरू करणे, टायर पुनस्तरण संयत्र सुरू करणे तसेच महामंडळाच्या मोकळ्या जागेचा व्यापारी तत्त्वावर उपयोग करणे यांसारख्या उपाययोजनांचा प्राधान्याने समावेश होता. यानुसार महामंडळाने व्यावसायिक तत्वावर मालवाहतूक सेवेत पदार्पण केले. महामंडळाने २१ मे २०२० पासून राज्यभरात अतिशय माफक दरात मालवाहतूक सेवा सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एसटीच्या महाकार्गो"चा मालवाहतुकीचा मार्ग मोकळा

राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत (अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वगळता) करण्यात येणाऱ्या मालवाहतुकीपैकी २५ टक्के मालवाहतूक एसटीच्या महाकार्गो मालवाहतुकीद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्याबाबतचा शासन निर्णय गृहविभागाद्वारे गुरुवारी जारी करत सर्व विभागांना निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: The ST Corporation will replace the state government's heavy, bulky passenger vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.