राज्यात एसटी महामंडळ दोन हजार इलेक्ट्रिक बस चालवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:09 AM2021-08-14T04:09:23+5:302021-08-14T04:09:23+5:30

मुंबई : तोट्यात असलेले एसटी महामंडळ राज्यात २००० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर चालवणार आहे. यापूर्वी औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, ...

ST Corporation will run 2,000 electric buses in the state | राज्यात एसटी महामंडळ दोन हजार इलेक्ट्रिक बस चालवणार

राज्यात एसटी महामंडळ दोन हजार इलेक्ट्रिक बस चालवणार

googlenewsNext

मुंबई : तोट्यात असलेले एसटी महामंडळ राज्यात २००० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर चालवणार आहे. यापूर्वी औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नांदेडसाठी १५० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २००० गाड्यांचे नियोजन करण्याबाबतचे आदेश उपमहाव्यस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिले आहेत.

इलेक्ट्रिक बसची वाहन वापर क्षमता ४०० किमीची आहे, परंतु ३०० किमीच्या अंतरावर चार्जिंग व्यवस्था केली जाणार आहे. औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे ३०० किमी अंतर पार केल्यानंतर चार्जिंग करणे बंधनकारक असणार आहे.

या बससाठी असलेला परवाना तसेच रस्ता कर व टोलशुल्क, उच्चदाबाची विद्युतवाहिनी आगारापर्यंत आणण्याचा खर्च व इतर खर्च एसटी महामंडळ करणार आहे. चार्जरची मालकी पुरवठादाराची राहणार असून, बससाठी एसटी महामंडळ वाहक पुरवणार आहे.

विभाग - गाड्या

औरंगाबाद प्रदेश - ३८९

मुंबई प्रदेश -३६९

नागपूर प्रदेश -२१७

पुणे प्रदेश -५१२

नाशिक प्रदेश -३५३

अमरावती प्रदेश -१६०

Web Title: ST Corporation will run 2,000 electric buses in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.