मुंबई - राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटी वरच अवलंबून आहे. यंदा दिवाळीत एसटीने जादा वाहतुकीचे नियोजन केले होते. त्याला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला.दिवाळीत एसटीने ६१५ कोटी रुपये कमावले आहेत. ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान दिवाळी हंगामात एसटीने सरसकट , १०टक्के भाडे वाढ केली होती. त्याचा एसटीला फायदा झाला आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि ५० टक्के तिकीट सवलतीची महिला सन्मान योजना यामुळे यंदा एसटीला उदंड प्रवासी लाभला आहे.
गेल्या वर्षी या ११ दिवसात २१८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.गेल्या वर्षी २१ आक्टोबर ते ३१ आक्टोबर दरम्यान दिवाळी हंगाम होता त्यावेळी देखील १० टक्के भाडेवाढ करण्यात आली होती.
शुक्रवारी ,१२ नोव्हेंबर धनत्रयोदशी- २७ कोटी ६२ लाख रुपयेबुधवारी, १५ नोव्हेंबर भाऊबीज - ३१ कोटी ६० लाख रुपयेसोमवारी, २० नोव्हेंबर भाऊबीज नंतर परतीचा प्रवास ३७ कोटी ६३लाख रुपये भाऊबीज परतीचा प्रवास रेकॉर्डब्रेकयोग्य पद्धतीने केलेले गाड्यांचे नियोजन आणि वर्षभरात आलेल्या नवीन गाड्यांचा ताफा यामुळे भाऊबिजेच्या दिवशी बुधवारी १४,६७७ बसगाड्या राज्यातील सर्व मागांवर धावल्या. या एका दिवसात महामंडळाने ३१ कोटी ६० लाखचा महसूल मिळवला होता. पण परतीच्या प्रवासात २० नोव्हेंबर रोजी एसटीच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्न ३७ कोटी ६३ लाख रुपये मिळाले.गेल्यावर्षी कमावले होते २१८ कोटीगेल्या वर्षी या ११ दिवसात २१८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.गेल्या वर्षी २१ आक्टोबर ते ३१ आक्टोबर दरम्यान दिवाळी हंगाम होता त्यावेळी देखील १० टक्के भाडेवाढ करण्यात आली होती.
दिवाळीत एसटीने ६१५ कोटी रुपये कमावले आहेत. या यशात एसटीचे चालक , वाहक आणि यांत्रिक यांत्रिकी कर्मचारी आणि सर्व वर्गातील कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. एसटीला पसंती देणाऱ्या प्रवाशांचे खूप खूप आभार . - शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ