Join us

ST कर्मचा-यांच्या संपाचा चौथा दिवस ! उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, संप मिटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 11:31 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मध्यस्थी केली आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मध्यस्थी केली आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यभरातील एसटी सेवा पूर्णतः ठप्प आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या सणात सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  

सर्वसामन्यांना होणार त्रास पाहता अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गुरुवारी (19 ऑक्टोबर ) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी आज संप मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच संप मागे घेतल्यानंतर एसटी संघटनांचे कर्मचारी तसंच नेते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ आणि उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेणार आहे.

'उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका'दरम्यान,  'अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे, तसाच एसटी कर्मचार्‍यांचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. मात्र उद्धव ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत आहेत.’ अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. 'परिवहन खातं हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका चालणार नाही.' अशी टीका गुरुवारी अशोक चव्हाण यांनी केली होती.  दरम्यान,  'अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे, तसाच एसटी कर्मचार्‍यांचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. मात्र उद्धव ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत आहेत.’ अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. 'परिवहन खातं हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका चालणार नाही.' अशी टीका गुरुवारी अशोक चव्हाण यांनी केली होती.  

संपाचा तिढा कायम

राज्य सरकार, एसटी प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यातील बोलणी बुधवारी (18 ऑक्टोबर) रात्री फिसकटल्यानंतर गुरुवारी त्यांच्यात चर्चाच न झाल्याने एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा प्रस्ताव कामगारांनी अमान्य केला, तर संघटनांनी सुचविलेली पगारवाढ देणे शक्य नाही, असे सरकारने सांगितले. रावते यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ न त्यांना बुधवारच्या चर्चेची माहिती दिली. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कामगार प्रतिनिधींना वाटाघाटींसाठी बोलावलेच नाही. संप मागे घेतला तरच सरकार पुढील बोलणी करेल, असा पवित्रा रावते यांनी घेतल्याने कामगार संतप्त आहेत.एसटी कर्मचा-यांच्या वेतनवाढीबाबत चांगला प्रस्ताव आम्ही दिला आहे. संबंधित संघटना स्थापन झाल्यापासूनची ७७ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. यापेक्षा अधिक वेतनवाढ देणे एसटी प्रशासनास अशक्य आहे. त्यामुळे आता संप मागे घ्यावा.- दिवाकर रावते, एसटी अध्यक्ष व परिवहनमंत्री

प्रशासनाने देऊ केले अवघे १२०० कोटीशिष्टमंडळाने एसटी कर्मचा-यांसाठी ४,५०० कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर २२०० कोटींपर्यंत खाली येण्याची तयारी शिष्टमंडळाने दर्शवली. मात्र, प्रशासनाने १२०० कोटीच देऊ, असे सांगितले. त्यामुळे चर्चेचा तिढा सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा बनला. प्रशासनाने २.५७ गुणोत्तरानुसार वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळासमोर ठेवला. त्या वेळी यात त्रुटी असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शिष्टमंडळाने त्यांचा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला. हा प्रस्ताव ३.५० गुणोत्तराचा प्रस्ताव होता.

टॅग्स :एसटी संपउद्धव ठाकरेभाजपाशिवसेनामहाराष्ट्र सरकार