Join us

वेतन रखडल्याने एसटी कर्मचारी आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 2:38 AM

गणेशोत्सव तोंडावर आला आहे. मात्र जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाºयांची घालमेल सुरू झाली आहे.

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांचे महिन्यातील वेतन ७ तारखेला झालेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.एसटी महामंडळातील कर्मचाºयांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला केले जाते. परंतु आॅगस्ट महिन्याची १७ तारीख उलटून गेली आहे, गणेशोत्सव तोंडावर आला आहे. मात्र जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाºयांची घालमेल सुरू झाली आहे.महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे २३ मार्चपासून एसटीची चाके थांबली. त्यामुळे महामंडळाला रोज कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि अधिकाºयांचे पगार रखडले आहेत.एसटीला दररोज २२ कोटींचे उत्पन्न होते ते आता ४० लाखांवर आले आहे. इतर राज्यांमध्ये पूर्ण प्रवासी घेऊन एसटी वाहतूक सुरू आहे. राज्यात सोशल डिस्टन्सिंग पाळून वाहतूक सुरू केली असती तरी २२ प्रवासी घेऊन एसटीला अर्धे उत्पन्न मिळाले असते. साधारण दररोज ११ कोटी म्हणजे महिन्याला ३३० कोटी उत्पन्न मिळाले असते. कर्मचाºयांच्या वेतनासाठी महिन्याला २७० कोटींची आवश्यकता असते.त्या उत्पन्नात वेतन देता आले असते. एकीकडे खासगी वाहतूक सुरू आहे, पण एसटी बंद आहे. जिल्ह्याअंतर्गत एसटी सुरू करायला हवी.>आॅगस्टचा दुसरा आठवडा संपला तरी जुलै महिन्याचा पगार मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव तोंडावर आला आहे, पण तयारीसाठी पैसे नाहीत.- एक एसटी कर्मचारीएस.टी. कर्मचाºयांचे जुलै महिन्याचे वेतन थकीत असून ते अद्याप मिळालेले नाही. गणपती सण तोंडावर आला असून सरकारने वेतनासाठी एस.टी.ला तत्काळ 3०० कोटी रुपयांचा निधी द्यावा.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस