एसटी कर्मचाऱ्यांना जूनचा पगारही ५० टक्केच मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 05:56 AM2020-07-05T05:56:17+5:302020-07-05T05:56:45+5:30

राज्य सरकारने सवलत मूल्यापोटी प्रतिपूर्तीची रक्कम दिल्यामुळे एसटी कर्मचाºयांना मार्चचे ७५%, एप्रिलचे १००% व मेचे ५०% वेतन देण्यात आले. मात्र आता राज्य सरकारकडून सवलतीचे पैसे येणार नाहीत.

ST employees will get only 50% of June salary? | एसटी कर्मचाऱ्यांना जूनचा पगारही ५० टक्केच मिळणार?

एसटी कर्मचाऱ्यांना जूनचा पगारही ५० टक्केच मिळणार?

googlenewsNext

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या पगाराप्रमाणे जूनचा पगार ५० टक्के मिळण्याची शक्यता आहे. डिझेल आणि इतर खर्च मिळून एकूण ८०० कोटींची देणी एसटी महामंडळाला द्यायची आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे दररोज २२ कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडत आहे. परिणामी, एसटीला कर्मचाºयांचे वेतन देताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे जूनचा पगारसुद्धा अर्धाच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्य सरकारने सवलत मूल्यापोटी प्रतिपूर्तीची रक्कम दिल्यामुळे एसटी कर्मचाºयांना मार्चचे ७५%, एप्रिलचे १००% व मेचे ५०% वेतन देण्यात आले. मात्र आता राज्य सरकारकडून सवलतीचे पैसे येणार नाहीत. परिणामी, दररोज बुडणारे २२ कोटी प्रवासी उत्पन्न, वाढता इंधन खर्च यामुळे महामंडळाचे आर्थिक गणित बिघडले आहे. इंधन खर्च आणि इतर खर्चाची देणी असे मिळून ८०० कोटी रुपये द्यायचे असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
तर, आर्थिक बाजू सावरण्यासाठी इतर पर्यायी मार्गांचा विचार सुरू आहे. स्वेच्छानिवृत्ती हा पर्याय आहे. एसटीच्या जागा भाड्याने देऊन त्वरित उत्पन्न मिळणार नाही. प्रवासी उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. पूर्ण पगार देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

Web Title: ST employees will get only 50% of June salary?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.