कोकणातील हापूस आंब्यापासून एसटी मालवाहतूकीस सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 08:24 PM2020-05-22T20:24:28+5:302020-05-22T20:25:03+5:30

मागील ७२ वर्ष अविरत प्रवासी दळणवळण सेवा देणारे एसटी महामंडळ देशातील एक अग्रगण्य सार्वजनिक दळणवळण उपक्रम असून त्यांच्या सेवेचे जाळे  २५० आगार व ६०१ बसस्थानकामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे

ST freight started from Hapus Mango in Konkan, says anil parab | कोकणातील हापूस आंब्यापासून एसटी मालवाहतूकीस सुरुवात 

कोकणातील हापूस आंब्यापासून एसटी मालवाहतूकीस सुरुवात 

Next

मुंबई : एसटी महामंडळाने मालवाहतूकीची सुरुवात केली आहे. सर्वप्रथम कोकणच्या हापूस आंब्याची वाहतूक करण्यात आली आहे. १५० आंब्यांच्या पेट्या घेऊन एसटीचा एक ट्रक रत्नागिरीकडून बोरिवलीकडे निघाला आहे. लवकरच कोकणचा हापूस मुंबई-पुण्याच्या ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.  प्रवासी वाहतूकीसह  एसटी महामंडळ आता वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची वाहतूकही करणार आहे.  राज्य सरकारने १८  मे रोजीच्या अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळास प्रवासी वाहनांमधून मालवाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे., अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

मागील ७२ वर्ष अविरत प्रवासी दळणवळण सेवा देणारे एसटी महामंडळ देशातील एक अग्रगण्य सार्वजनिक दळणवळण उपक्रम असून त्यांच्या सेवेचे जाळे  २५० आगार व ६०१ बसस्थानकामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे. महामंडळाकडे सुमारे १८ हजार ५०० बस असून त्यामध्ये सुमारे ३०० ट्रक चा समावेश आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी, महामंडळाने प्रवासी वाहतूकीसाठी असलेल्यासुविधांचा लाभ मालवाहतूक करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या ट्रक मधून मालवाहतूक करण्यात येणार आहे. त्यामधून ९ मेट्रिक टनापर्यंत वजनाच्यामालाची वाहतूक थेट पद्धतीने किंवा टप्पा पद्धतीने केली जाणार आहे. महामंडळातर्फे प्रवासी वाहनांमध्ये अंतर्गत बदल करून ९ मेट्रिक टन वजनाचापर्यंतच्या मालाची वाहतूक केली जाणार आहे.
मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या बुकिंगची व्यवस्था, महामंडळाच्या प्रत्येक आगारात व बस स्थानकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे व यासाठीची कार्यप्रणाली लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या तसेच इतर मालाच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाने अतिशय माफक दरामध्ये मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्यावतीने दिली आहे. 
 

---------------------------------

मालवाहतूकीसाठी मध्यवर्ती कार्यालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती
मालवाहतुकीची कार्यप्रणाली ठरविण्यासाठी, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या महामंडळाच्या विभागीय कार्यालयात समन्वय अधिकाऱ्याची (नोडल ऑफिसर) ची नेमणूक करण्यात आली आहे.
एसटी महामंडळातर्फे समाजातील सर्व घटकांना म्हणजेच शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना माफक दरात उपलब्ध करून दिलेल्या मालवाहतुकीच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा, असे आवाहन परब यांनी केले आहे.

Web Title: ST freight started from Hapus Mango in Konkan, says anil parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.