मुंबई : बीडच्या कॉन्स्टेबलचा ‘ललिता’ ते ‘ललित’ या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच लिंग परिवर्तन विभाग सुरू होणार आहे, मुंबईसह अन्य ठिकाणांहूनही लिंग असणा-या आठ जणांनी संपर्क केल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यासाठी विशेष समितीच तयार केली आहे. हा बाह्यरुग्ण कक्ष मंगळवारी सुरू राहील. समितीत स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, प्लॅस्टिक सर्जन आदींचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली.
सेंट जॉर्जमध्ये लवकरच लिंग परिवर्तन विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:58 AM