सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच अद्ययावत शवागर; कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 05:52 AM2018-12-09T05:52:46+5:302018-12-09T05:53:16+5:30

सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच अद्ययावत शवागर सुरू होणार आहे. याकरिता दोन कोटींचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत निविदा प्रक्रिया सुरू आहे.

St. George's Hospital; Crore fund sanctioned | सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच अद्ययावत शवागर; कोटींचा निधी मंजूर

सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच अद्ययावत शवागर; कोटींचा निधी मंजूर

Next

मुंबई : सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच अद्ययावत शवागर सुरू होणार आहे. याकरिता दोन कोटींचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत निविदा प्रक्रिया सुरू आहे. मार्च महिन्यापर्यंत हे अद्ययावत शवागर रुग्णांसाठी उपलब्ध होईल.

सेंट जॉर्ज रुग्णालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारांकरिता येत असतात. मात्र त्या तुलनेत रुग्णालयातील शवागर सुस्थितीत नव्हते. परंतु, आता राज्य शासनाने याकरिता पुढाकार घेऊन प्रक्रियेला वेग दिला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत निविदा प्रक्रियेद्वारे काम सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली आहे. रुग्णालयातील एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाºया या रुग्णालयात महिन्याला किमान ४०० व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यात येते. यातील बरेचसे मृतदेह हे अपघातातील प्रकरणांतील असतात. त्यामुळे बºयाचदा ओळख पटत नसल्याने ते शवागरातच पडून असतात. शवागाराची स्थिती अत्यंत गैरसोयीची असल्याने मृतदेह ठेवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र आता नव्या शवागरामुळे या अडचणींना तोंड देणे सोपे होईल.

एप्रिल २०१७ साली माझ्या चालकाचा मृत्यू झाला होता. त्या वेळी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान येथील शवागाराची भयंकर स्थिती समोर आली. त्या वेळेस ‘डिग्निटीइन डेथ’ या शीषर्काअंतर्गत मोहीम सुरू केली होती. यासंदर्भात आॅनलाइन याचिका दाखल केलेल्या रेणू कपूर यांनी सांगितले की, फेसबुक, ऑनलाइन याचिकेद्वारे या विषयाला वाचा फोडली होती. त्या माध्यमातून अवघ्या काही वेळात ३८ हजार जणांनी याला पाठिंबा दिला. याची दखल वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने घेऊन त्यावर बैठक घेतली. त्यानंतर या प्रक्रियेला वेग आला.

Web Title: St. George's Hospital; Crore fund sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.