एसटी स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 06:18 PM2020-05-26T18:18:27+5:302020-05-26T18:18:58+5:30

३६ हजार ४३२  बसेस मधून ४ लाख ३३ हजार ५०९ मजुरांचा प्रवास

ST to help migrant laborers | एसटी स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला

एसटी स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला

Next

 

मुंबई : इतर राज्यातील अडकलेल्या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत आणि इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना महाराष्ट्राच्या सीमेवर एसटी बसची सुविधा देण्यात आली आहे.   ९ मेपासून सुरु झालेल्या या सुविधेपासून  आतापर्यंत ३६  हजार ४३२ बसेसद्वारे सुमारे ४ लाख ३३ हजार ५०९ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.  एसटी बसद्वारे मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.

काही स्थलांतरीत मजुरांनी पुढच्या प्रवासासाठी श्रमिक रेल्वे सेवेचा ही लाभ घेतला आहे. एसटी महामंडळाच्या बसच्या माध्यमातून, इतर राज्यातील स्थलांतरीत मजुर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले जात आहे. इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचे ही काम केले जात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. 

 

Web Title: ST to help migrant laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.