मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मराठीचा वापर अनिवार्य आहे, पण मराठी अंमलबजावणीचे परिपत्रक काढणाºया एसटीच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाने याला हरताळ फासला आहे. कामगारांच्या परिपत्रकात इंग्रजी भाषेचा वापर केला आहे.एसटीच्या परिपत्रकानुसार कामकाजासाठी अधिकारी, कर्मचारी यांना मराठीचा वापर अनिवार्य आहे. पण कर्मचाऱ्यांबाबत नुकतेच एक पत्रक जाहीर केले आहे. पत्रकातील मजकूर मराठीमध्ये आहे, पण त्यामध्ये साडेतीनशेहून अधिक नावे इंग्रजीतून लिहिण्यात आली आहेत.कामगार संघटनेच्या एका पदाधिकाºयाने सांगितले की, एसटी महामंडळात मराठीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. कर्मचाºयाने नाव लिहिताना एखादे अक्षर जरी इंग्रजीमधून लिहिले तर त्याला १०० ते २०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. मराठीचा वापर न करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी.पत्रकात मराठीचा वापर करायला हवा होता. इंग्रजीचा वापर करणे चुकीचे आहे. हे कोणी केले,का केले त्यामागचे कारण तपासावे लागेल त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, कर्मचारीवर्ग व औद्योगिक संबंधमहाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन झेडले होते़ त्या आंदोलनाचा धसका घेत राज्यातील सर्व दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या़ मात्र आता सरकारी कार्यालयातच मराठी उपेक्षित असल्याचे चित्र आहे़
एसटीला मराठीचे वावडे, परिपत्रकात इंग्रजीचा वापर, मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाकडूनच हरताळ फासला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 3:10 AM