सेंट जोसेफचा थरारक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2015 01:23 AM2015-10-26T01:23:06+5:302015-10-26T01:23:06+5:30

डॉन बॉस्को आंतरशालेय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सेंट जोसेफ शाळेने ११ वर्षांखालील मुलांच्या पूल ए गटात अवघ्या एक गुणाने बाजी मारली.

St. Joseph's thrilling victory | सेंट जोसेफचा थरारक विजय

सेंट जोसेफचा थरारक विजय

Next

मुंबई : डॉन बॉस्को आंतरशालेय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सेंट जोसेफ शाळेने ११ वर्षांखालील मुलांच्या पूल ए गटात अवघ्या एक गुणाने बाजी मारली. सुलोचनादेवी सिंघानिया शाळेविरुद्ध चुरशीच्या लढतीत सेंट जोसेफने ७-६ असा विजय मिळवला. ११ वर्षांखालील मुलींच्या पूल ए गटात कॅथेड्रल आणि जॉन कॅनॉन शाळेने बॉम्बे स्कॉटिश शाळेचा १९-१० असा धुव्वा उडवला.
माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेत बास्केटबॉल स्पर्धेचे सामने खेळवण्यात आले. सेंट जोसेफ विरुद्ध सिंघानिया यांच्यातील लढतीत सिंघानिया शाळेने मध्यांतरापर्यंत ६-२ अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर सेंट जोसेफने सामन्यात दमदार पुनरागमन केले. सलग बास्केट करत सेंट जोसेफने सिंघानिया शाळेला संधीच दिली नाही. अखेर ७-६ अशा गुणसंख्येने सेंट जोसेफने विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्य सामन्यात डॉन बॉस्को ए संघाने कॅथेड्रल आणि जॉन कॅनॉन शाळेवर १४-०३ अशी मात केली.
मुलींच्या सामन्यात कॅथेड्रल आणि जॉन कॅनॉन शाळेने आपला दबदबा कायम राखला. कॅनॉन शाळा विरुद्ध बॉम्बे स्कॉटिश शाळा यांच्यातील सामन्यात कॅनॉन शाळेने आक्रमक बास्केट करत मध्यांतरापर्यंत आघाडी घेतली. मध्यांतरानंतर ती आघाडी कायम ठेवत त्याचे १९-१० असे विजयात रूपांतर केले. पूल बी संघात डिव्हाईन चाईल्ड शाळेने सिंघानिया शाळेचा १७-०६ असा दारुण पराभव केला.
दुसरीकडे १३ वर्षांखालील मुलांच्या पूल ए गटात डॉन बॉस्को शाळेने बॉम्बे स्कॉटिश शाळेचा ३१-०४ आणि मुलींच्या पूल बी गटात चेंबूरच्या सेंट अँथोनी शाळेने शिवशुवान शाळेवर २३-६ अशी मात करीत स्पर्धेत आगेकूच कायम राखली. (क्रीडा प्रतिनिधी )

Web Title: St. Joseph's thrilling victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.