दिवाळीत एसटी प्रवास महागणार, 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरदरम्यान एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 05:33 PM2018-10-09T17:33:08+5:302018-10-09T17:33:30+5:30

दरवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) एसटीची सरसकट १०% भाडेवाढ होणार असून, ती केवळ १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल.

ST journey in Diwali will be expensive, 10% increase in ST ticket between 1st November and 20th November | दिवाळीत एसटी प्रवास महागणार, 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरदरम्यान एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ  

दिवाळीत एसटी प्रवास महागणार, 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरदरम्यान एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ  

Next

 मुंबई - दरवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) एसटीची सरसकट १०% भाडेवाढ होणार असून, ती केवळ १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल. मागील वर्षी याच काळात सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० % अशी भाडेवाढ केली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी केवळ १० % भाडेवाढ करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३०% पर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. यंदा  यानुसारच दरवर्षीप्रमाणे सेवाप्रकार निहाय २०, १५ व १०% अशी भाडेवाढ न करता सर्व सेवा प्रकारासाठी केवळ २० दिवसांसाठी सरसकट १०% भाडेवाढ करण्यात आली असून सदर  भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून लागू होईल.

Web Title: ST journey in Diwali will be expensive, 10% increase in ST ticket between 1st November and 20th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.