एसटी की चल गई... १६०० बसेस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 05:37 AM2020-03-07T05:37:03+5:302020-03-07T05:37:07+5:30
या बसेसची खरेदी आणि एसटी बसस्थानके अत्याधुनिक करण्यासाठी ४०१ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १६०० नवीन बसेस नजीकच्या काळात दाखल होणार आहेत. या बसेसची खरेदी आणि एसटी बसस्थानके अत्याधुनिक करण्यासाठी ४०१ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
जुन्या बसेस बदलल्या जातील. कमी अंतराच्या प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधा असलेल्या वायफाययुक्त बस ग्रामीण जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींना त्यांच्या वेळापत्रकानुसार एसटीने ये-जा करण्यासाठी गरजेनुरुप मार्ग व्यवस्थापन व वेळापत्रक करण्यात येणार असल्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले.
>एसटी महामंडळाची सद्य:स्थिती
संचित तोट ५१९२ कोटी रु.
दररोजचे प्रवासी ६५ लाख
बसस्थानकांची संख्या ६०९
आगारे २५०
वाहक व चालक संख्या प्रत्येकी ३४ हजार
बसची एकूण संख्या १८२३२