मुंबई : एसटीला आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, प्रशासकीय कामगारांना संपूर्ण पगाराच्या ५० टक्के कमी पगार देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामगारांना आर्थिक झळ बसणार आहे.राज्यातील एसटीच्या विविध आगारांचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्न नसल्याने महामंडळाला आर्थिक डबघाईला सामोरे जावे लागत आहे. इंधन, एसटीची देखभाल आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी महामंडळाकडे पैसे नाहीत. २०१९-२० या काळात एसटीचा संचित तोटा सुमारे पाच हजार कोटींवर पोहोचला आहे.यासह इंधन दर आणि देखभालीचा खर्च वाढल्याने एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय कामगारांचा ५० टक्के पगारकमी देण्याची योजना आखण्यात आली आहे.डिझेल खरेदीसाठी काही आगारांकडे पैसे नाहीत. पैसे उभे करण्यासाठी महामंडळाकडून एसटी कर्मचाºयांच्या वेतनातून पगाराची कपात केली जात आहे. राज्यातील विविध एसटी आगारांमधील कर्मचाºयांच्या वेतनातून १० ते ४० टक्क्यांपर्यंत कात्री लावण्यात आली आहे. यासह आता प्रशासकीय अधिकाºयांच्या वेतनातून ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कपात केली जाणार आहे. करण्यात येणाºया या कपातीमुळे त्यामुळे प्रशासकीय कामगारांना आर्थिक झळ बसणार आहे.
एसटी तोट्याचा फटका एसटी कामगारांना; वेतनाच्या ५० टक्के पगार कमी देण्याचे नियोजन?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 2:55 AM